Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील नारायणपूर येथे बिबट्याचा चार शेळ्यावर हल्ला सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: किल्ले पुरंदरच्या पायथ्याला असलेल्या श्री क्षेत्र नारायणपूर येथे कापूरहोळ रस्त्यालगतच्या बोरकर वस्तीतील डोंगराच्या बाजूच्या घराबाहेर बांधलेल्या चार शेळ्यावर पाडव्याच्याच दिवशी म्हणजे गुरुवार दिनांक 19 रोजी रात्री बिबट्याने हल्ला केला त्यात, तीन शेळ्यांचा मृत्यू झाला असून, एक शेळी गायब असल्याची माहिती सासवड वन विभागाचे अधिकारी सागर ढोले यांना देण्यात आली होती, बोरकर वस्ती मधील आप्पा शंकर कोकरे यांनी आपल्या घरासमोर चार शेळ्या बांधल्या होत्या, त्यांच्यावर बिबट्याने गुरुवारी रात्री हल्ला केला ,त्या तीन शेळ्यांचा मृत्यू झाला असून, एक शेळी सापडत नाही, तिला बिबट्याने पळवल्याचा संशय आहे, याबाबतची माहिती शुक्रवारी दिनांक सकाळी त्यांनी वन विभागाला कळवली असून, त्यानुसार सासवडचे वन विभाग अधिकारी सागर ढोले यांनी आदेश दिल्यावर, वनपाल गणेश पवार, वनरक्षक नारायणपूर योगेश नजन यांनी घटनास्थळी जाऊन, चौकशी केली असता तसेच नुकसान भरपाई मिळण्याकरिता कागदपत्रे तयार केली. माजी सरपंच चंद्रकांत बोरकर व नारायणपूरचे ग्रामसेवक भाऊसाहेब भवर म्हणाले की, आम्ही रात्री रोज गस्त घालतो, परंतु परवा गारांचा पाऊस पडल्याने, गारा होता त्यामुळे कोणीही गस्तीला नव्हते, त्यांचाच फायदा घेऊन, बिबट्याकडून हा प्रकार झालेला आहे, याबाबत नारायणपूरचे प्रशासकीय सरपंच प्रदीप बोरकर यांनी याबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, अचानक अशा घटना या बिबट्याकडून घडल्यामुळे नारायणपूरचे नागरिक भयभीत झालेले आहेत, याबाबत ठोस अशी शासनाची या सामान्य शेतकऱ्याला मदत मिळावी, हीच एक कृतज्ञता आहे, अशी याबाबत माहिती देताना प्रशासकीय सरपंच प्रदीप बोरकर यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.

Post a Comment

0 Comments