पुरंदर तालुक्यातील सासवडच्या मंडल कृषी अधिकारी हा जाळ्यामध्ये; तर लाच घेताना पकडले असून, त्यावर गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : सासवड येथील मंडल कृषी अधिकारी अमोल सुनील सुतार वय 31 यांच्या विरोधामध्ये लाच मागणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, ही कारवाई सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलेला आहे, याबाबत पोलीस निरीक्षक शैलजा शशिकांत शिंदे एसीबी पुणे यांनी फिर्याद दिलेली आहे, तक्रारदार दिलीप गंगाराम वाडकर राहणार वारवडी तालुका पुरंदर यांनी ट्रॅक्टर अनुदान प्रस्ताव मंजुरीसाठी संबंधित कार्यालयात पाठपुरावा केला होता, 29 डिसेंबर 2025 रोजी पंचायत समिती कार्यालयामध्ये आरोपी सुतारने पंच समक्ष तीन हजार रुपयाची लाच मागितल्याचे, निष्पन्न झाल्याची फिर्यादीत नमूद करण्यात आलेले आहे, या प्रकरणात एसीबी कडून विविध टप्प्यावर पडताळणी करण्यात आली आहे, 21 जानेवारी 2026 व 26 फेब्रुवारी 2026 रोजी सापळा लावण्यात आला होता, मात्र आरोपीस संशय आल्याने त्याने प्रत्यक्ष लाच स्वीकारली नाही, पडताळणी पंचनाम्यातील निष्कर्ष तक्रारदाराचे जबाब आणि उपलब्ध पुराव्याच्या आधारे आरोपीने शासकीय पदाचा गैरवापर करून, लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने, गुन्हा हा नोंदवण्यात आलेला आहे, पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे या तपास अधिकारी म्हणून नियुक्त आहेत, ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक, अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments