पुरंदर तालुक्यामध्ये विमानतळाच्या क्षेत्रामध्येच बिबट्याच्या वाढत्या वावरांने संपूर्ण पुरंदर मध्ये चिंता वाढलेली; तर बिबट्याच्या वाढत्या हालचाली मुळे ग्रामस्थांची त्यावर कडक कारवाई करण्याची केली मागणी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राइम न्यूज: पुरंदर तालुक्यात गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा वावर लक्षणीय प्रमाणामध्ये वाढल्या कारणामुळे, शेतकऱ्यांमध्ये तीव्रतेचे वातावरण निर्माण झालेले आहे, थंडीचे दिवस असल्याने, शेतकऱ्यांना विजेच्या उपलब्धतेनुसार, लवकर शेतात जावे लागत असल्याकारणाने, त्या काळामध्ये बिबट्याचे दिवसाढवळ्या शेतात, रस्त्यावर दर्शन होत असल्याकारणाने, शेतकऱ्यांची दैनंदिन शेती काम धोक्यात आली असून, तालुक्यात कुठल्याही गावात गेल्यास बिबट्याचा विषय चर्चेत असल्याचे, स्पष्टपणे जाणवत आहे. पुरंदर परिसरातील काळदरी पानवडी,चिवहेवाडी आणि दक्षिण भागातील काही गावापर्यंत बिबट्याचे अस्तित्व होते, तर शेतकरी त्यामुळे त्रस्त झालेले असून, त्याच्या दिवेघाट, बापदेवघाट , सोनोरी, वनपुरी, उदाची वाडी या गावापर्यंत विमानतळाच्या क्षेत्रामध्ये त्याची सुरुवात झालेली असून, कुंभारवळण या ठिकाणी सुद्धा बिबट्या रात्री दिसला असल्याकारणाने, लोक भयभीत झालेले आहेत, उसाच्या क्षेत्र वाढीमुळे बिबट्यांना सुरक्षितता निर्माण झालेली असून, त्या ठिकाणी पुरंदरचा पूर्व भाग हा पारंपारिक दृष्टीने दुष्काळी मानला जात असला, तरी फक्त पावसाच्या पाण्यावरच शेती होत असून, पुरंदर उपसा योजना ,जानाई शिरसाई योजना अशा या कारणामुळे प्रामुख्याने पुरंदर उपसामुळे तर वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण,एखतपुर, मुंजवडी, खानवडी, पारगाव या भागांमध्ये उसाच्या दाट शेतीमुळे बिबट्याचा लपून, बसण्याचा मार्ग सुरक्षित असला तरी, त्या ठिकाणी गावांमध्ये भयभीत शेतकऱ्यांना बिबट्याचा वारंवार सामना हा करावा लागत असल्या कारणामुळे, बिबट्याच्या प्रजनन वाढीचाही प्रकार गंभीर होत चाललेला आहे, त्यामुळे प्रामुख्याने विमानतळाच्या भागांमध्येच बिबट्याचा वावर हा जास्त दिसून येत असल्याकारणाने, शेतकरी हा भयभीत झालेला आहे ,तर शेतकऱ्यांनी खालील मागण्या केलेल्या आहेत: बिबट्याने नियमित वावरणारी ठिकाणे शोधून तेथे पिंजरे बसवावेत, उसाच्या दाट शेताची ड्रोनच्या सहाय्याने पाहणी करावी, बिबट्याचा शोध मोहीम तातडीने राबवावी. वन विभागाने त्यासाठी दिला प्रतिसाद: सागर ढोले वनपरिक्षेत्र अधिकारी सासवड यांनी दिलेल्या माहितीनुसार, वनपुरी येथे आमच्या रेवेन्यू टीमने पाहणी केली मात्र :कोणतेही ठसे किंवा बिबट्याच्या हालचाली चिन्ह दिसलेले नाहीत, तरीही जिथे बिबट्याचा वावर आहे, तेथील मागणीनुसार आवश्यक ठिकाणी पिंजरे बसवले जातील ,आमचे कर्मचारी सतत त्याचा मागवा घेत आहेत. शेतकऱ्यांना सोशल मीडियावर आफवावर विश्वास ठेवू नये आणि फेक फोटो पुढे पाठवू नयेत, अशीही मागणी केलेली आहे. अशी माहिती सागर ढोले, वनपरिक्षेत्र अधिकारी वन विभाग सासवड. यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments