Hot Posts

6/recent/ticker-posts

Recent posts

Show more
कोडीत येथील श्रीनाथ म्हस्कोबा यांची पुन: प्राणप्रतिष्ठा          सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                           श्री शेत्र कोडीत मध्ये श्रीनाथ म्हस्कोबा याची पुन:प्राणप्रतिष्ठा केली जाणारा आहे, या निमित्ताने अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर रविवारपासून दिनांक 19 ब्रह्मा कलशोस्थव, महायज्ञ, अखंड हरिनाम सप्ताह, किर्तन महोत्सव अशी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीनाथ म्हस्कोबा प्राणप्रतिष्ठापना आणि मंदिराच्या सुवर्णकलशाला 121 नद्यांच्या पाण्याने अभिषेक करून ,या सोहळ्यास प्रारंभ होईल, दिनांक एक मे रोजी महापूरणाहुती आणि महामंगल आरती करून, या सोहळ्याची सांगता होईल, याविषयी श्री देवस्थान म्हस्कोबा महाराज tracts यांनी माहिती कळवलेली आहे, महायज्ञ सोहळ्यामध्ये चार वेदांचे पारायण केले जाईल ,सहस्रचंडी यज्ञ अतिरुद्र सोहकार, लक्ष मोदक हवन गणेश याग, विष्णूयाग सुदर्शनयाग, शिव पंचायतन, होम, यज्ञ आणि शिवपार्वती विवाह सोहळा यांचे आयोजन केले आहे. यज्ञ सोहळ्यात 151 ब्राह्मण आणि तीन हजार यजमान सहभागी होणार आहेत. अखंड हरिनाम सप्ताह व भव्य कीर्तन महोत्सवामध्ये हरिभक्त परायण श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर ,हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली महाराज नामदास, हरिभक्त परायण आचार्य अमृता श्रम स्वामी महाराज, हरिभक्त परायण डॉक्टर जयवंत महाराज बोधले, हरिभक्त परायण आचार्य डॉक्टर रामकृष्ण महाराज लहवितकर ,हरिभक्त परायण कान्होबा महाराज देहूकर, हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज देशमुख, हरिभक्त परायण बंडातात्या महाराज कराडकर, हरिभक्त परायण नामदेव महाराज लबडे, हरिभक्त परायण संजय नाना महाराज धोंडगे यांचे कीर्तन होणार आहेत, हा कीर्तन महोत्सवात मंदिरांमधील सायंकाळी सात ते रात्री नऊ या वेळात होणार आहेत या सोहळ्यासाठी श्री क्षेत्र कोडीत येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर आणि परिसरात जोरदार तयारी सुरू आहे, यज्ञ मंडप उभारण्यात आला असून, महाप्रसादासाठी देखील मंडप उभारला आहे ,या ठिकाणी प्रतिदिन तीस ते चाळीस हजार भक्तासाठी महाप्रसादाचे नियोजन केले जाणार आहे, मंदिराला रंगरंगोटी केली असून, सुवर्णकलश जलाभिषेक करण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था मंडपाच्या माध्यमातून केली आहे, याविषयीची श्री देवस्थान म्हस्कोबा महाराज tracts  व कोडीतकर येथील ग्रामस्थांनी ही माहिती दिली आहे.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी व पॉलिटेक्निक संशोधन पद्धती या विषयावर एकदिवशीय राज्यस्तरीय वेबिनार उत्साहात संपन्न                    सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     सासवड (ता. पुरंदर) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी व पॉलीटेकनिक, सासवड येथे “संशोधन पद्धती” या विषयावर दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी एकदिवसीय राज्यस्तरीय वेबिनार उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने करण्यात आली. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. निलेश भोसले यांनी वेबिनारची रूपरेषा स्पष्ट करत संशोधन पद्धतीचे शैक्षणिक व औषधनिर्माण क्षेत्रातील महत्त्व अधोरेखित केले. प्राचार्य डॉ. राजश्री चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी संशोधनाभिमुख दृष्टिकोन विकसित करण्याची गरज व्यक्त केली.या वेबिनारमध्ये विविध मान्यवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. पहिल्या सत्रात डॉ. दादासाहेब कोकारे (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ) यांनी “संशोधन पद्धती: एक व्यावहारिक दृष्टिकोन” या विषयावर मार्गदर्शन करत संशोधनाची मूलभूत तत्त्वे, नियोजन व पद्धतशीर दृष्टिकोन यावर सविस्तर माहिती दिली. दुसऱ्या सत्रात डॉ. विक्रांत धमक (विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ फार्मसी, अहमदनगर) यांनी “संशोधन डेटाचे सांख्यिकीय विश्लेषण: ग्राफपॅड प्रिझममधील प्रात्यक्षिक व अन्वयार्थ” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी संशोधनातील आधुनिक साधने व तंत्रज्ञान यावर प्रकाश टाकला. तिसऱ्या सत्रात डॉ. मोनिका राव (AISSMS कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे) यांनी “औषधनिर्माणशास्त्रातील संशोधन नीतीशास्त्र: नवोपक्रम व जबाबदारी यांचा दुवा” या विषयावर मार्गदर्शन करत शैक्षणिक संशोधनातील गुणवत्ता व डेटा विश्लेषणाचे महत्त्व स्पष्ट केले. चौथ्या सत्रात डॉ. समीर नदाफ (भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, पलूस) यांनी “प्रत्यक्ष कार्यवाहीतील DOE: संशोधन कार्यक्षमता व उत्पादन विकास वृद्धी” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी फार्मास्युटिकल संशोधनातील प्रत्यक्ष अनुप्रयोग व संधी याविषयीही माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सृष्टी जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनात प्रा. सागर भिसे, प्रा. विशाखा गायकवाड, सुनीता बाठे तसेच डॉ. स्मिता पवार यांनी मोलाचे योगदान दिले. शेवटी प्रा. विशाखा गायकवाड (एचओडी, पॉलीटेकनिक) यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला.या वेबिनारमध्ये राज्यभरातील विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमातून सहभागींच्या संशोधन पद्धतीविषयक ज्ञानात भर पडून भविष्यातील संशोधनासाठी त्यांना दिशा मिळाली.
पुरंदर तालुक्यातील वीर येथील चैत्र अमास्येनिमित्त श्रीक्षेत्र वीर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी                             सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                 श्री क्षेत्र वीर येथे आज शुक्रवार चैत्र वद्य अमावास्या 17एप्रिल रोजी अमावास्येनिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. पहाटे ४.३० वाजता पूजा होऊन, मुख्य गाभारा बंद करण्यात आला. त्यानंतर सकाळी ६ वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळपासून देवस्थान ट्रस्ट व भाविकांतर्फे देवाला अभिषेक करण्यात आले. सकाळी १० वाजता देवाला भाविकांच्या दहीभाताच्या पूजा बांधण्यात आल्या. देऊळवाड्यात दगडी कासवावर सालकरी, गोसावी मंडळींचा पारंपारिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरु होता. दुपारी १२ वाजता धुपारती होऊन, गाभारा तासभर बंद करण्यात आला. दुपारी १.१५ मिनिटांनी गाभारा पुन्हा दर्शनासाठी खुला करण्यात आला.   आज महाप्रसादाचे आयोजन राजेंद्र बुरुंगले व पोपट बुरुंगले, माळेगाव यांचेमार्फत करण्यात आले होते. देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, उनाच्या दाहकतेपासून बचावासाठी सावलीची व्यवस्था, लाईट व जनरेटर, दर्शनबारी, वाहनतळ व्यवस्था, परिसर स्वच्छता, जादा कर्मचारी, स्वयंसेवक, ट्रॅफिक पोलिस, इ. चे आयोजन करण्यात आल्याचे ट्रस्टचे मुख्य विश्वस्त  मोहन रावसो धुमाळ यांनी सांगितले. यावेळी संपूर्ण विश्वस्त, सल्लागार मंदिरात उपस्थित होते.
शिवहार लहाने यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पुणे जिल्हा  कार्यवाह पदी बिनविरोध निवड                      सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       म.ए.सो वाघीरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सासवड येथील सहा. शिक्षक शिवहार लहाने यांची  अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाशी संलग्न असलेल्या  महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पुणे जिल्हा  कार्यवाह पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पुणे जिल्हाध्यक्ष  निलेश काशीद यांनी शिवहार लहाने यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.                    महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही शिक्षकहित, शिक्षणहित व राष्ट्रहित या विचाराने कार्य करणारी शिक्षकांची अग्रगण्य राज्यव्यापी संघटना असून आजपर्यंत  महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक मतदार संघातून  अनेकवेळा या शिक्षक संघटनेच्या व्यक्तींनी शिक्षकांचे प्रतिनिधित्व केलेले आहे. आगामी काळात पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे संघटनात्मक काम प्रभावीपणे करून  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध शैक्षणिक समस्या सोडविणे तसेच  पुणे जिल्ह्यात शाळा तिथे शिक्षक परिषदेचा कार्यकर्ता हा उपक्रम राबविणार असल्याचा निर्धार सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला.                 पुणे जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध शैक्षणिक व शासन स्तरावरील समस्यांची सोडवणूक व्हावी यासाठी दर महिन्याच्या  दुसऱ्या मंगळवारी पुणे येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी संवाद बैठक आयोजित केली जाईल, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत यासाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी काम करणार असल्याचे  त्यांनी यावेळी आपल्या मनोगतातून सांगितले. आगामी नोव्हेंबर - डिसेंबर २०२६ मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानपरिषद पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  शिवहार लहाने यांची झालेली निवड महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या  संघटनात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जात आहे. लहाने यांचा पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शिक्षकांचा असलेला थेट संपर्क संघटनेच्या विस्तारासाठी महत्वपूर्ण  ठरणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, पुणे विभागाचे माजी  शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, नागपूर विभागाचे माजी शिक्षक आमदार नागो. गाणार, पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे, आमदार राहुल कुल, माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार  संग्राम थोपटे, माजी आमदार अशोक टेकवडे, राज्य कार्याध्यक्ष गुलाबराव गवळे, राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, पुणे विभागाचे संघटन मंत्री रामदास अभंग, संजीव मांढरे, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक कुंडलिक मेमाणे, प्राचार्य दत्ताराम रामदासी,प्राचार्य अशोक दहिफळे, भाऊसाहेब खोसे, प्राचार्या पूजा जोग, महेश शेलार, दिपक भोसले, राजेंद्र बडे,अरुण खेडकर, दत्तात्रय गायकवाड, विजय पिलाने  आदींनी अभिनंदन केले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बांधकाम मंत्री  शिवेंद्रसिंहराजे भोसले, बाबासाहेब पाटील, राजेंद्र दर्डा, मधुकर भावेयांच्या मुख्य उपस्थितीत 18 एप्रिल शनिवार रोजी परिषदेच्या अधिवेशनाचे भव्य उद्घाटनदेशभरातून 2500 पत्रकार उपस्थित राहणार..                                                       मुंबई  प्रतिनिधी :                                                      अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचं 44 वं राष्ट्रीय अधिवेशन 18 आणि 19 एप्रिल 2026 रोजी रोजी उदगीर इथे होत आहे. उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहात असून लोकमतचे समुह संपादक मा. श्री. राजेंद्र दर्डा अधिवेशनाचे उद्घाटन करतील.आ. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.. बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री मा.  शिवेंद्रसिंहराजे भोसले अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आहेत तर आमदार मा. संजय बनसोडे सह स्वागताध्यक्ष आहेत. परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.  एस.एम.देशमुख हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील तर मा. मिलिंद अष्टीवकर हे अधिवेशनाचे अध्यक्ष असतील. ज्येष्ठ पत्रकार मा. मधुकर भावे यांचे मार्गदर्शन पत्रकारांना लाभणार आहे.18 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुलात अधिवेशनाचे उद्घाटन होईल. तत्पूर्वी उदगीर शहरातून प्रभात फेरी काढली जाणार असून त्यामध्ये शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी  सहभागी होतील. दुपारच्या सत्रात उदगीरमधून बाहेर पडून पत्रकारितेच्या क्षेत्रात देदीप्यमान यश मिळविणाऱ्या पत्रकारांचा सत्कार आणि त्यांच्या मनोगताचा कार्यक़म प्रा. जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली होईल.. दुपारी 4 ते 5.30 या वेळेत "लोकप्रतिनिधींच्या माध्यमांकडून अपेक्षा या विषयावर आमदार रोहीत पवार यांची मुलाखत घेतली जाणार आहे..रात्री 7 वाजता लोककलेचा जागर हा मनोरंजनाचा कार्यक्रम होईल..19 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे याची मुलाखत होईल.. पुढारी न्यूज चे संपादक प्रसन्न जोशी ही मुलाखत घेतील.. सकाळी 10.30 ते 12.30 या वेळेत माध्यमं सत्ताधाऱ्यांना झुकतं माप देताहेत का? या विषयावरील परिसंवादात भाजप उपाध्यक्ष केशव उपाध्ये, कॉंग्रेसचे हनुमंत पवार, राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण, शिवसेनेचे राहूल लोंढे, उबाठाचे जयेश वाणी हे विविध राजकीय पक्षांचे प्रवक्ते सहभागी होतील.. पत्रकारांची बाजू मांडतील ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई..दुपारी 1.30 ते 3 या वेळेत "टीव्हीच्या पडद्यावरची दुनिया" या विषयावरील चर्चेत प्रसन्न जोशी, विशाल परदेशी, प्रज्ञा पोवळे, श्वेता दांडेकर, सौरभ कोरटकर, विशाल पाटील सहभागी होत आपले अनुभव सांगतील. ..दुपारी 3 ते 5 या वेळात अधिवेशनाचा समारोप समारंभ होईल..शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, जय महाराष्ट्रचे संपादक प्रसाद काथे आणि मुक्तपीठचे संपादक तुळशीदास भोईटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.. एस.एम.देशमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.. समारोप समारंभात लातूर जिल्ह्यातील काही मान्यवर पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे.अधिवेशनास राज्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, डिजिटल मिडिया परिषदेचे प्रमुख अनिल वाघमारे, विभागीय सचिव तसेच अधिवेशन मुख्य संयोजक सचिन शिवशेट्टे, रवी उबाळे, मराठवाड्याचे उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, उदगीर तालुका मराठी पत्रकार परिषदेचे  अध्यक्ष युवराज धोतरे , लातूर जिल्हा डिजिटल मिडीयाचे अध्यक्ष बिभीषन मद्देवाड , पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे  निमंत्रक अर्जुन जाधव ,जिल्हा डिजिटल मिडीयाचे सचिव सिद्धार्थ सुर्यवंशी तसेच परिषदेचे सर्व उपाध्यक्ष, विभागीय सचिव आणि कार्यकारिणी सदस्यांनी  केले आहे.......
पोलिसांच्या तत्परतेमुळे मायलेकींची कुटुंबाशी भेट                    सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                   सासवड पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि झारखंड पोलिसांच्या मदतीने बोपदेव घाटांमधील भरकटलेल्या 35 वर्षीय महिलेची तिच्या चिमुकल्या मुलीसह कुटुंबाशी सुखरूप भेट झाली असून, भाषेचा अडथळा आणि घरचा पत्ता सांगता येत नसतानासुद्धा पोलिसांनी हे कठीण कार्य यशस्वीपणे पार पाडले असून, 7 एप्रिल रोजी बोपदेव डोंगर रांगेतील एक महिला तिच्या मुलीसह फिरत असल्याची माहिती कानिफनाथ देवस्थान ट्रस्टने पोलिसांना दिली होती, या माहितीवरून हवालदार अविनाश होळकर व पथकाने मायलेकीला ताब्यात घेतले या महिलेला मराठी भाषा येत नसल्याने, ओळख पटवणे मोठे आव्हान होते ,ओळख पटेपर्यंत त्यांना आंबोडी येथील जिव्हाळा वृद्धाश्रमामध्ये ठेवले होते, तेथे डॉक्टर संजीव कुमार भाटे आणि कर्मचाऱ्यांनी तिची काळजी घेतली, ही महिला तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत होती, मात्र कर्मचाऱ्यांनी तिला संयमाने सांभाळले, महिलेकडे असलेल्या आधार कार्डच्या आधारे पोलिसांनी झारखंड मधील पूर्व सिंहभूम पोलिसांशी संपर्क साधला तिथल्या पोलिसांच्या मदतीने नातेवाईकांचा शोध घेण्यात यश आले, अखेर बुधवारी दि. 15 रोजी सविता सरदार आणि तिच्या मुलीला पती अजय सरदार व बहिण दिपाली सरदार यांच्या स्वाधीन करण्यात आले, सासवड पोलिसांची संवेदनशीलता आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे परराज्यातील ही महिला पुन्हा सुखरूप आपल्या कुटुंबात परतली आहे, या कौतुकास्पद कामगिरीबद्दल सासवड पोलीस दलाचे सर्व स्तरांमधून कौतुक केले जात आहे.
सासवड व जेजुरी येथे विशेष असे शिबिर                    सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने दि. 18 एप्रिल रोजी जेजुरी आणि 25 एप्रिल रोजी सासवड येथे विशेष असे शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे, ज्या अर्जदारांची शिकवू अणुज्ञानाची मुदत संपलेली आहे, त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे ,याकरिता 17 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5:30 पर्यंत शिबिराची नियोजित वेळ घेऊन, पक्क्या अनुज्ञाती संदर्भातील आवश्यक व कामकाज पूर्ण करावे, असे आवाहन उपप्रादेशिक अधिकारी स्वप्नील भोसले यांनी केले आहे.
Load More That is All