पोलिसांच्या तत्परतेमुळे मायलेकींची कुटुंबाशी भेट सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि झारखंड पोलिसांच्या मदतीने बोपदेव घाटांमधील भरकटलेल्या 35 वर्षीय महिलेची तिच्या चिमुकल्या मुलीसह कुटुंबाशी सुखरूप भेट झाली असून, भाषेचा अडथळा आणि घरचा पत्ता सांगता येत नसतानासुद्धा पोलिसांनी हे कठीण कार्य यशस्वीपणे पार पाडले असून, 7 एप्रिल रोजी बोपदेव डोंगर रांगेतील एक महिला तिच्या मुलीसह फिरत असल्याची माहिती कानिफनाथ देवस्थान ट्रस्टने पोलिसांना दिली होती, या माहितीवरून हवालदार अविनाश होळकर व पथकाने मायलेकीला ताब्यात घेतले या महिलेला मराठी भाषा येत नसल्याने, ओळख पटवणे मोठे आव्हान होते ,ओळख पटेपर्यंत त्यांना आंबोडी येथील जिव्हाळा वृद्धाश्रमामध्ये ठेवले होते, तेथे डॉक्टर संजीव कुमार भाटे आणि कर्मचाऱ्यांनी तिची काळजी घेतली, ही महिला तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत होती, मात्र कर्मचाऱ्यांनी तिला संयमाने सांभाळले, महिलेकडे असलेल्या आधार कार्डच्या आधारे पोलिसांनी झारखंड मधील पूर्व सिंहभूम पोलिसांशी संपर्क साधला तिथल्या पोलिसांच्या मदतीने नातेवाईकांचा शोध घेण्यात यश आले, अखेर बुधवारी दि. 15 रोजी सविता सरदार आणि तिच्या मुलीला पती अजय सरदार व बहिण दिपाली सरदार यांच्या स्वाधीन करण्यात आले, सासवड पोलिसांची संवेदनशीलता आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे परराज्यातील ही महिला पुन्हा सुखरूप आपल्या कुटुंबात परतली आहे, या कौतुकास्पद कामगिरीबद्दल सासवड पोलीस दलाचे सर्व स्तरांमधून कौतुक केले जात आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments