पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी प्रथमच महाराष्ट्र केसरीचा थरार होणार; मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आखाडा ; तर मातीतील कुस्ती स्पर्धा विजेत्याला मजबूत स्थिती मिळणार! सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता.पुरंदर येथील प्रथमच प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी, मातीतील कुस्ती स्पर्धा मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आयोजित करण्यात येणार असून, याबाबतची माहिती कुस्ती महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस गौरव रोशनलाल दिल्ली यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. यावेळी संघटनेचे राज्य सचिव मोहन खोपडे ,राज्य अध्यक्ष नितीन बारणे, ऑलिंपिक पहिलवान व स्पर्धेचे तांत्रिक अध्यक्ष ज्ञान सिंग, आयोजक प्रकाश जगताप आदी उपस्थित होते. ही स्पर्धा महाराष्ट्र शैली कुस्ती संघटना यांच्या वतीने भरवण्यात येत असून ,गेल्या 60 वर्षापासून ही संघटना हिंदकेसरी, रुस्तुम हे हिंद भारत केसरी, यासारख्या नामांकित स्पर्धांचे आयोजन करिता आहे, सासवड येथील महाराष्ट्र केसरी स्पर्धा पहिलवान प्रकाश बापू जगताप प्रतिष्ठान आणि संघटनेचे सचिव पहिलवान मोहन खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार असल्याचे गौरव रोशनलाल यांनी स्पष्ट केले आहे. दोन कोटीची बक्षिसे आयोजक प्रकाश जगताप यांनी जाहीर केले असून, की स्पर्धेमध्ये एक महाराष्ट्र केसरी गटासाठी प्रथम क्रमांक चार चारचाकी मोटर, द्वितीय क्रमांक सियारा चारचाकी मोटार, तृतीय क्रमांक बुलेट मोटारसायकल, चतुर्थ क्रमांक दुचाकी वाहन अशी सुमारे दोन कोटी रुपयांची बक्षिसे विजेत्या पहिलवानांना देण्यात येणार आहेत, सासवड मध्ये प्रथमच होणाऱ्या स्पर्धेमुळे कुस्तीप्रेमी मध्ये उत्साहाचे वातावरण असून, महाराष्ट्रातील नामांकित पहिलवानांची 'मादीयाळी' सासवड येथे पाहायला मिळणार आहे. भावनिक व ऐतिहासिक असे महत्त्व सासवडला आले आहे, महाराष्ट्र केसरी होणे हे प्रत्येक पैलवानाचे स्वप्न असून, हा किताब जिंकणारा पैलवान केवळ विजेता न राहता, संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान ठरत असतो, पहाटेचा सराव ,आखाड्यातील अथक मेहनत, शिस्तबद्ध, जीवन, संयम, अपयशावर मात करण्याची जिद्द या सर्वांची कसोटी स्पर्धेत लागत असते, त्यामुळे ही स्पर्धा केवळ ताकतीची नव्हे, तर मानसिक बळ अनुभव डावपेचांचाही परीक्षा आहे, राज्य अध्यक्ष नितीन बारणे, मनाले की, आमचा संघ ६० वर्षापासून सातत्याने कार्यरत आहे, लाल मातीतील कुस्तीची परंपरा ही आमची ओळख आहे, ज्यांनी संघटनेबाबत शंका उपस्थित केल्या आहेत ,त्यांनी अधिकृत परवानगी दाखवावी असा सवाल केला आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments