Hot Posts

6/recent/ticker-posts

शरद ख्रिस्ती यांचे निधन सासवड प्रतिनिधी: सासवड शहरात 50 वर्षापेक्षा जास्त काळ सासवड शहरातील नागरिकांना भल्या पहाटे वृत्तपत्र वाचण्यासाठी देणारे शरद शांताराम ख्रिस्ती (वय ६७ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. आजही सासवड मधील वाचकांना कोण व्यक्ती आपल्या घरापर्यंत नियमित ठराविक वेळी वृत्तपत्र देते हे माहिती नाही. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ख्रिस्ती यांना त्रास जाणवु लागल्याने, पुण्यातील खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मेंदूची शस्त्रक्रिया करून त्यांना नुकत्यास घरी पाठवण्यात आले होते. मात्र त्यानंतर अल्पावधीत त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुली असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments