Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेचा 'माझी वसुंधरा 'अभियानामध्ये राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला; तर सासवड नगरपरिषदेचा आणखी एक मानाचा तुरा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड नगर परिषदेचे स्वच्छता आणि पर्यावरण जतनामध्ये नेहमीच आघाडीवर असलेल्या ,सासवड ता. पुरंदर येथील नगर परिषदेने आपल्या क्षेत्रांमध्ये मानाचा आणखी असा एक तुरा चांगलाच प्रकारे रोवला असून ,गतवर्षीच्या 'माझी वसुंधरा' अभियानामध्ये 4.0 अंतर्गत 25 ते 50 हजार लोकसंख्या गटामध्ये सासवड नगर परिषदेने राज्यांमधील दुतीय क्रमांक पटकावलेला आहे, शनिवारी दि. 21 रोजी मुंबई येथे झालेल्या या सोहळ्यामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, पर्यावरण व हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सासवड नगरपरिषदेला हा बहुमान मिळाला असून, गतवर्षीच्या अभियानामध्ये राज्यातील 22 हजार 632 स्थानिक स्वराज्य संस्था मधून, सासवडने हे यश मिळवलेले असून, सासवड नगर परिषदेने राबवलेले वृक्षारोपण, कचरा, व्यवस्थापन आणि सौरऊर्जेचा वापर यासारख्या उपक्रमाची दखल या निमित्त राज्यस्तरावर घेतली आहे ,या पुरस्काराचे स्वरूप तीन कोटी रुपयांचे बक्षीस आणि सन्मानचिन्ह असे आहे, मागील वर्षी प्रशासकीय राजवट असल्यामुळे, यावर्षी हा गौरव सोहळा संपन्न झाला. सासवड नगर परिषदेसाठी यांनी स्वीकारला पुरस्कार माजी आमदार संजय जगताप, मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, गटनेते अजित जगताप, नगरसेविका प्रियांका जगताप, लीना वढणे, स्मिता जगताप ,अर्चना जगताप, नगरसेवक ज्ञानेश्वर जगताप, राजन (भैय्या) जगताप, प्रदीप राऊत, ज्ञानेश्वर गिरमे, सोपान रणपिसे, मयूर चौखंडे, सुहास लांडगे, विजय वढणे, संदीप राऊत, साकेत जगताप, सौरभ वढणे, सुहास जगताप, तुषार जगताप ,हिरामण हिवरकर, शहर स्वच्छता समन्वयक राम कारंडे, अमित बहिरट आदींनी पुरस्कार स्वीकारला. 'माझी वसुंधरा' अभियान 4.0 अंतर्गत पंचवीस ते पन्नास हजार लोकसंख्या गटांमध्ये, मागील वर्षी प्रशासकीय राज असल्यामुळे, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस यावर्षी संपन्न झाले असून, सातत्याने नियोजन, काटेकोरपणे अंमलबजावणी आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागाची हे फलित आहे, पर्यावरण संवर्धनाची ही चळवळ अधिक व्यापक करत पुढील सर्व स्पर्धेमध्येही सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आमचा निर्धार आहे. डॉक्टर कैलास चव्हाण मुख्याधिकारी सासवड नगर परिषद. हा पुरस्कार नगर परिषदेचा केवळ नसून, तर संपूर्ण सासवड करांचा पुरस्कार आहे, चंदूकाका जगताप यांनी पाहिलेल्या स्वच्छ व पर्यावरण पूरक सासवड शहराला एक अध्यावत स्वप्न नगरी साकर करण्याच्या दिशेने आपण एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकत आहोत ,पुढील काळातही यश टिकवून ठेवणार असून, सासवड राज्यातच नव्हे तर, देशातही आदर्श शहर बनवण्यासाठी आमचा कटिबद्ध प्रयत्न राहील. आनंदी (काकी) जगताप नगराध्यक्ष सासवड नगरपरिषद.

Post a Comment

0 Comments