Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूरमधील मानाची कावड असलेल्या सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : सासवड (ता. पुरंदर) मधील तेल्या भुत्याच्या कावडीचे सासवड ते पंढरपूर वारीचे नियोजन करण्यात आले. श्रीपांडुरंगाच्या भेटीनंतर कावडीचा सासवडकडे प्रवास सुरू झाल्याचे कैलास कावडे महाराज यांनी सांगितले. कावडीने मंगळवार वार (दि. 17) पंढरपूरकडे प्रस्थान केले. या वर्षी कावडी बरोबर महिलाचा ही सह भाग होता मार्गावर ठिकठिकाणी कावडीचे स्वागत करण्यात आले. नातेपुते ली येथील स्वागतानंतर माळशिरस तालुक्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली. कावड सायंकाळी पंढरपूर येथे विसावली. या वेळी शिवयोगी कैलास कावडे महाराजांचा सत्कार करत मानाचा विडा देण्यात आला. पहाटे ४ वाजता कावडीला चंद्रभागा स्नान करण्यात आले. प्रथम श्रीहरीची भेट पाहण्यासाठी हजारो भाविक कावडीबरोबर संत श्रीनामदेव पायरीजवळ आले. कावडीचे दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी झाली होती. श्रीविठ्ठल-रुक्मिणी देवस्थान पंढरपूरतर्फे कावडीस मानपान, मानाचा विडा आणि कावडे महाराजांचा सत्कार करण्यात आला. शिखर शिंगणापूरचा श्रीशंभू महादेव आणि पंढरीचा श्रीपांडुरंग यांचीसाक्षात भेट घडवून आणल्याबद्दल देवस्थान आणि समस्त पंढरपूर ग्रामस्थांच्या वतीने कावड संयोजकांचे आभार मानण्यात आले. तसेच. राजेंद्र चंद्रभागा गणपत शेळकेउप जिल्हाधिकारी तथा विशेष कार्यकारी अधिकारी, पंढरपूर व शिव भक्त मनीष राजेंद्र भोंगळे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर पंढरपूर ( महाराष्ट्र ) यांचे कावड मंडळाच्या वतीने आभार मानले परतीच्या प्रवासात फलटणच्या गॅलेक्सी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉक्टर नवनाथ बंडगर यांनी कावडीचे स्वागत केले महापूजेनंतर रात्री ११ वाजता सासवडकडे प्रस्थान झाले.

Post a Comment

0 Comments