Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणचे काळभैरवनाथ मंदिर बंद राहणार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड शहराचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ, श्री भैरवनाथ व श्री जोगेश्वरी माता या पुरातन देवस्थानच्या मालकीचा गट क्रमांक ३०१ मधील आठ एकर ,(तीन हेक्टर 19 आर पोट खराबा दोन आर बागायती )इनाम जमीन भकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देवस्थान ट्रस्टने केलेला आहे, ही जमीन एक श्री भैरवनाथ देव नावावर असल्याने, याबाबतचे प्रकरण सध्या महसूल न्यायालयामध्ये प्रलंबित आहे, अतिक्रमणधारकांनी या जमिनीवरील ऊसतोड करून, ऊस गाळपासाठी सोमेश्वर कारखाना येथे पाठवलेला आहे, त्यामुळे जोपर्यंत महसूल न्यायालयातून स्थगितीचा आदेश प्राप्त होत नाही तोपर्यंत, श्री काळभैरवनाथ व इतर मंदिर भाविकासाठी बंद ठेवण्याचा निर्णय दृष्टीने घेतलेला आहे, देवस्थानच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थांनी कायदेशीर लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घेण्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे, यापूर्वीही याच मुद्द्यावर आंदोलन केले होते ,मात्र संबंधित वही वाटावदार जमीन परत देण्यास तयार नसून, प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे व संबंधित कुटुंब राजकीय पार्श्वभूमीचे असल्याने, वारंवार तणावाची परिस्थिती निर्माण होत असल्याचे सांगण्यात आलेले आहे, जमिनीवरील ऊसतोड मशागत किंवा वहिवाट थांबवावी, यासाठी ट्रस्ट व भैरवकर कुटुंबीयांनी सासवड पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दाखल केलेला आहे, यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जगताप, उपाध्यक्ष पांडुरंग भोंगळे, गाव पाटील संग्राम जगताप ,पुजारी मोहन भैरवकर ,राजेंद्र भैरवकर, चैत्री उत्सव कमिटीचे अध्यक्ष रवींद्र शिरसागर, उपाध्यक्ष प्रकाश जगताप, जयसिंग जगताप ,रवींद्र जगताप ,मोहन जगताप ,प्रवीण जगताप ,आनंद (भैय्या) जगताप सासवड मधील सर्वसामान्य नागरिक आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments