महिलांचे सक्षमीकरण, कर्तुत्ववान, सन्मान, व्याख्याने, स्पर्धांनी महिला दिनांचा आनंदोत्सव सासवड मध्ये नगरपरिषद बालकल्याण समितीतर्फे स्वसंरक्षणाचे धडे सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महिलांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या सोबतच स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे असून, चांगला आहार, पुरेशी झोप, मेडीस्टेशन आणि व्यायामाचा अवलंब करावा, तसेच दर सहा महिन्यांनी पोटाची सोनोग्राफी आणि छातीची तपासणी करून आपली जीवनशैली चांगली ठेवावी ,असे आवाहन प्रसिद्ध महिला रोगतज्ञ डॉक्टर सुचिता भालेराव यांनी केले आहे .सासवड नगर परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनांमध्ये हा कार्यक्रम झाला, कार्यक्रमाची सुरुवात नगराध्यक्ष आनंदी काकी जगताप, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनीताई जगताप, महिला रोग तज्ञ डॉक्टर सुचिता भालेराव, पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, महिला बालकल्याण समितीच्या सभापती प्रियांका जगताप, उपसभापती लीना वढणे यांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलाने झाली. उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी स्त्रीला घर आणि समाजात योग्य असे स्थान असावे, एकमेकींचे ऐकून घ्यावे, आणि एकमेकींना पुढे घेऊन जा, हाच खरा महिला दिन आहे असे सांगितले.अर्चना पाटील यांनी कायदेविषयक मार्गदर्शन करताना पालकांनी आपल्या किशोरवयीन मुलींशी मैत्रीचे नाते निर्माण करावे असा सल्ला दिला. यावेळी पायल वाघोले आणि दुर्गा थोपटे यांनी महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले. या सोहळ्यामध्ये महिला बचत गटांना उद्योगासाठी प्रोत्साहन देण्यासाठी स्टॉल्स लावले होते, लकी ड्रॉ मध्ये दहा महिलांना पैठणी बक्षीस म्हणून दिली. याप्रसंगी मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण ,गोविंद लाखे, अजित जगताप, मंदार गिरमे, स्मिता जगताप आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन कार्यालयीन अधीक्षक नूतन जाधव, लिपिका प्राजक्ता राजगुरू ,अनुराधा भोकरे, एन. यु. एल. एम विभागाचे जस्मिन मंदाळे यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरपरिषद शाळेतील वर्षा राणी शिर्के, स्वाती देवकर, स्मिता जगदाळे व संतोष देवकर या शिक्षकांनी केले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments