पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वारे जोमात सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची सध्या तरी चाहूल लागली असून, राजकीय वातावरण सध्या तरी चांगलेच तापलेले आहे, आरक्षणाची सोडत जाहीर होताच ,इच्छुक उमेदवार आणि सध्या तरी दिवाळीनिमित्त प्रचार, गाठीभेटी, मजबूत असे संघटन करून व मतदारापर्यंत संपर्क कसा होईल, याची नियोजन केले जात आहे. यावर्षी पुरंदर तालुक्यात 4 जिल्हा परिषद व 8 पंचायत समिती सदस्य निवडले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने पंचायत समिती सभापती पदाची सोडत प्रथम जाहीर करण्यात आली असल्याने, ते पद ओबीसी आरक्षणासाठी राखीव ठेवण्यात आले आहे, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारामध्ये उत्सुकता वाढलेली आहे ,त्यासाठी दिवे व भिवडी गणांमध्ये ओबीसी आरक्षण असल्याने, तेथील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे चांगलीच दिसून आली आहेत, पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी देखील होताना दिसत आहेत, पुरंदरचे विद्यमान आमदारविजय शिवतारे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी युती करणार असल्याची सध्या चर्चा चालू आहे, त्यामुळे जर जिल्हा परिषदेमध्ये दोन व पंचायत समितीमध्ये चार असे सम समान प्राबल्य मिळाले, तरच युती होईल, असा स्थानिक नेतृत्वाकडून पुरंदरच्या माहिती मिळाली असून ,जर असे नाही झाले तर ,स्वतंत्र लढावे लागणार आहे असे कार्यकर्त्यांचे मत आहे, त्यामुळे स्वतंत्र लढले तर चौरंगी लढत होणार आहे, माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेस सोडून, भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे, भाजपची पुरंदरमध्ये चांगलीच ताकद वाढलेली आहे, तरी त्यांना आपली राजकीय अस्तित्व टिकवणे ही खूप मोठी कसरत करावी लागणार आहे ,दिवे गराडे गटात माजी मंत्री दादासो जाधवराव व भाजप नेते गंगाराम जगदाळे यांचा बालेकिल्ला मानला जातो, त्याला सुरू लावण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ,काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट जोरदार व्ह्यू रचना निवडणुकीसाठी आखली जात आहे ,तर गत निवडणुकीमध्ये वीर भिवडी गटांमध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषद दोन्ही ठिकाणी शिवसेनेने आपला झेंडा फडकवला होता, निरा कोळविहीरे गटात सुद्धा पंचायत समिती व जिल्हा परिषद या दोन्ही गटांमध्ये शिवसेनेने आपला झेंडा फडकवलेला होता, बेलसर माळशिरस गटातील काही गावे विमानतळ व सासवड ते रिसेपिसे पर्यंत चाललेले कामकाज रोडच्या या दोन मुद्द्यावर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक गाजणार आहे, भूसंपादनाचा असंतोष हा कुणाच्या पथ्यावर पडतो, हे पाहावे लागणार आहे, त्याचा फटका हा कोणत्या उमेदवाराला फटका बसतो ,तर कोणाला फायदा होतो हे पावे लागणार आहे. यामध्ये स्थानिक स्तरावर गटबाजी, पक्षांतर नवे चेहरे व जुन्या नेतृत्वाला वाव देणे हे राजकीय प्रयोग दिसून येत आहेत. शिवसेना विद्यमान आमदार विजय शिवतारे, भाजप माजी आमदार संजय जगताप, गंगाराम जगदाळे, बाबाराजे जाधवराव, माजी आमदार अशोक टेकवडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, संभाजी झेंडे, जालिंदर कामठे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट ,काँग्रेस यामध्ये प्रामुख्याने विजय कोलते, सुदाम इंगळे, माणिक झेंडे, प्रदीप पोमण,अभिजीत जगताप यांची कसोटी चांगलीच निवडणुकीसाठी लागणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये उमेदवारी अर्ज पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होणे, बंडखोरी व प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू होणार आहे. वीर भिवडी सर्वसाधारण पुष्कराज जाधव, हरिभाऊ लोळे, समीर जाधव, दिलीप यादव,, शैलेश तांदळे, रुपेश धुमाळ, पिनू काकडे, शरद जगताप, राहुल गायकवाड .निरा कोळविहीरे ओबीसी महिला डॉ. प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे, तेजश्री काकडे, सम्राधनी सचिन लंबाते, सानिका अजिंक्य टेकवडे. दिवे गराडे सर्वसाधारण महिला संगीता काळे, ज्योती झेंडे ,एडवोकेट गौरी कुंजीर, बेलसर माळशिरस सर्वसाधारण माऊली यादव, रमेश इंगळे, गौरव कोलते, दत्ता झुरुंगे. वीर सर्वसाधारण ऋतुजा धुमाळ, संतोष धुमाळ, सतीश वचकल,पत्रकार शिवदास शितोळे, तानाजी धुमाळ, छाया यादव, अमोल धुमाळ, सोपान राऊत. भिवडी ओबीसी महिला नलिनी लोळे, पूजा मोकाशी, शैला मोकाशी, निरा एससी महिला मोनिका गायकवाड, हेमलता जगदाळे. कोळविहिरे सर्वसाधारण महिला भारती मस्के, अंजना भोर, सोनाली कणसे, ज्योती भुजबळ, सारिका कुदळे. दिवे ओबीसी अमित झेंडे, एडवोकेट नितीन कुंजीर, सुरज गदादे, अमोल कामठे. गराडे सर्व साधारण महिला सुषमा संदीप कटके, अर्चना कटके, दिव्या जगदाळे. बेलसर सर्वसाधारण सुनीता कोलते, तुषार झुरंगे, धीरज जगताप, कैलास जगताप, एडवोकेट बाबासो पिलाने, निलेश कृष्णा जगताप. माळशिरस सर्वसाधारण संभाजी काळाणे, महादेव शेंडकर, अरुण यादव ,पंढरीनाथ सोनवणे, महादेव बोरावके.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments