पुरंदर तालुक्यात नव्या जुन्यांचा सामना असून, राजकीय रणसंग्राम तर पक्षप्रवेशांनी बंडखोरी पक्षांतर आणि विविध पंचरंगी लढतीने निवडणुकीची राजकीय समीकरणे विस्कळीत सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उंबाठा आणि काँग्रेस यांच्यात काट्याची व अत्यंत चुरशीची लढत रंगणार असल्याचे, चित्र स्पष्ट झाले असून, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून, आता बंडखोरी आणि पक्षांतरामुळे संपूर्ण तालुक्यामध्ये राजकीय वातावरण तापू लागलेले आहे,निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली सर्वच उमेदवारांना समान संधी असल्याचे चित्र खऱ्या अर्थाने, आज पासूनच प्रचाराला प्रचंड वेग आला असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मधील मनोमिलन, तालुका शिवसेनाप्रमुख हरिभाऊ लोळे यांचा भाजपमध्ये प्रवेश करून मिळालेली उमेदवारी, तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम (आप्पा) इंगळे यांचे निकटवर्तीय कैलास इंगळे यांचा भाजप प्रवेश व त्यांच्या मुलाला मिळालेली उमेदवारी यामुळे वातावरण तर ढवळून निघालेले आहे, वीर भिवडी गटातून हेमंत( कुमार )माहूरकर यांनी माघार घेतली नसून, या मतदारसंघांमध्ये सहा रंगी लढत होत आहे, याचा फटका कोणाला बसतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे, बेलसर माळशिरस गटात सुद्धा राजकीय भूकंप घडलेला आहे, राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार व माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे यांना उमेदवारी राष्ट्रवादीने नाकारली असून, त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत, निवडणूक रिंगणात उडी घेतली असून, याच गटात राष्ट्रवादीचे आणखी इच्छुक उमेदवार अमोल कामठे यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली ,ते शिवसेना उंबाठा पक्षाकडून रिंगणात उतरलेले आहेत, आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित सात गावे या गटांमध्ये येत असल्यामुळे, ही गावी कोणाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे, वीर गटात भाजपचा शिवसेनाला 'खो' शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या वीर गटांमध्ये मोठी राजकीय उल्ताफालक पाहायला मिळालेली आहे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष व इच्छुक हरिभाऊ लोळे यांची उमेदवारी नाकारल्याने, त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला भाजपने, देखील क्षणाचाही विलंब न करता, लोळे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करत राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडून दिली आहे, या घडामोडीमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे, भाजपचा याचा किती फायदा होतो,हे निकलातून स्पष्ट होईल, कारण या ठिकाणी भाजपचे पिनू काकडे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होत आहे, गराडे गटात तिरंगी लढत निश्चित राजकीय दृष्टी अत्यंत महत्त्वाचे गटामध्ये तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, भाजपने माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे यांची कन्या दिव्या जगदाळे यांना उमेदवारी दिली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार बापू पठारे यांच्या कन्या रूपाली अमोल झेडे तर शिवसेनेकडून माजी जिल्हा परिषद सदस्य ज्योती राजाराम झेंडे यांच्यात अटीतटीची लढत होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे, निरा -शिवतक्रार गटात चौरंगी लढत निश्चित राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या निरा -शिव तक्रार गटामध्ये चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांची कन्या दुर्गाडे प्राजक्ता दिगंबर यांना उमेदवारी दिली आहे, तर धायगुडे सीमा संदीप यांना कमळ चे चिन्ह देऊन उमेदवारी दिलेली आहे, बरकडे सविता राजेंद्र यांची खून हात असून, त्यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिलेली आहे, तर अतुल म्हस्के शिवसेना (शिंदे गटाचे) पुरंदर तालुक्यातील पंचायत समितीचे माजी सभापती यांच्या सुविद्य पत्नी मस्के भारती अतुल यांना शिवसेना (शिंदे गटाने) उमेदवारी दिलेली आहे, यामध्ये सुद्धा निरा-शिवतक्रार कोळविहीरे गटामध्ये व पंचायत समितीच्या निवडणुकीत अटीतटीची निवडणूक होणार आहे, 51 बेलसर माळशिरस गटात सर्वसाधारण मध्ये इंगळे अजय कैलास कमळ, इंगळे रमेश रामचंद्र धनुष्यबाण, कामठे अमोल दत्तात्रेय मशाल, कोलते गौरव विजय घड्याळ, कोलते शहाजी रत्नाकर झाडू, झुरंगे दत्तात्रय मारुती हात. 101 माळशिरस गणात सर्व साधारण कड अजिंक्य रामदास घड्याळ, काळाणे हनुमंत मुरलीधर हात, चौंडकर संदीप श्रीरंग झाडू, यादव न्यानोबा आप्पा कमळ, यादव शरद बाळासो धनुष्यबाण. 102 बेलसर गणात सर्व साधारण कोलते कुशाल संजय हात, जगताप कैलास पंढरीनाथ कमळ, जगताप निलेश कृष्णा घड्याळ, निंबाळकर माणिक बाळासो धनुष्यबाण. खेडेकर सुहास नवनाथ ऑटो रिक्षा. 52 वीर भिवडी गटात सर्वसाधारण जाधव पुष्कराज संजय घड्याळ, जाधव समीर अरविंद धनुष्यबाण, माळवे नवनाथ चंद्रकांत हात, लोळे हरिभाऊ कुंडलिक कमळ, धिवार अनिल लक्ष्मण गॅस सिलेंडर. 103 भिवडी गणात नागरिकांचा मागास प्रवर्ग पोमण अनुजा अमोल घड्याळ, मोकाशी पूजा सागर धनुष्यबाण, शिंदे सायली मनोज कमळ. 104 वीर गणात सर्वसाधारण जगताप प्रवीण बाळासो धनुष्यबाण, धुमाळ उत्तम महादेव घड्याळ, धुमाळ महेश चंद्रकांत हात, धुमाळ सुधीर शिवाजी कमळ, वचकल किशोर विश्वास कपबशी. 50 दिवे गराडे गटात सर्वसाधारण महिला जगदाळे दिव्या संदीप कमळ, झेंडे ज्योती राजाराम धनुष्यबाण, झेंडे रूपाली अमोल घड्याळ. 99 गराडे गणात सर्वसाधारण महिला कटके अर्चना ज्ञानेश्वर घड्याळ, कटके ललिता दिलीप कमळ ,रावडे सुप्रिया विशाल धनुष्यबाण. 100 दिवे गणात नागरिकांचा मागास प्रवर्ग कामठे देविदास संभाजी कमळ, झेंडे अमित भाऊसो घड्याळ, मगर बाळासो दगडू धनुष्यबाण. 53 निरा -शिव तक्रार कोळविहीरे नागरिकांचा मागास प्रवर्ग दुर्गाडे प्राजक्ता दिगंबर घड्याळ, धायगुडे सीमा संदीप कमळ, बरकडे सविता राजेंद्र हात, मस्के भारती अतुल धनुष्यबाण .105 कोळविहिरे गणात सर्वसाधारण महिला खैरे रत्नमाला दिलीप हात, निगडे स्मिता संतोष घड्याळ, मस्के सीमा भाग्यवान कमळ, साळुंखे शीतल सतीश धनुष्यबाण. 106 निरा- शिवतक्रार गणात अनुसूचित जाती महिला कांबळे मोनिका स्वप्निल घड्याळ, केदारी रेखा नितीन धनुष्यबाण ,भोसले वंदना बाळासाहेब कमळ, सोनवणे गिता शुद्धोधन हात, भोसले अर्चना देविदास फुटबॉल. पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक बंडखोरी, पक्षांतर ,आणि प्रतिष्ठेच्या लढतीमुळे रंगतदार बनत चाललेली आहे, जुन्या, नव्यांचा सामना हा सुद्धा यांच्यामध्ये रंगणारा असून, कोणाच्या गळ्यात सत्तेची माळ पडते, याचा फायदा हा फक्त येत्या सात फेब्रुवारीलाच होणार आहे असे दिसून येत आहेत.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments