उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन बारामती जवळ विमान अपघात; तर महाराष्ट्रभर शोककळा राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या राजकारणातील प्रभावी नेते अजित अनंतराव पवार यांचे मंगळवारी दि. 28 रोजी बारामती जवळ झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन असे झाले असून, राजकीय सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातून तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे, प्राप्त माहितीनुसार अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत असताना, लँडिंग च्या वेळी त्यांच्या चार्टडॅ विमानाला अपघात झाला,अपघात इतका भीषण होता की, विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील इतर प्रवासी पाच मेंबर्स यांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे, यामध्ये अजित पवार यांच्यासह पांजन यांचा मृत्यू झाल्याची अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन ,अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथके, तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असता, परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून, अपघाताच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे, नागरी विमान वाहतूक विभागाकडूनही चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अजित पवार हे त्यादिवशी बारामती परिसरात नियोजित कार्यक्रम बैठकीसाठी येत होते, त्यांच्या अचानक जाण्याने बारामती सह, संपूर्ण राज्यात शोकाचे वातावरण आहे, अनेक ठिकाणी कार्यकर्ते समर्थक आणि नागरिकांनी अश्रूंनी श्रद्धांजली अर्पण केली, दरम्यान: राज्यपाल मुख्यमंत्री, केंद्रीय व राज्यस्तरीय नेते विविध पक्षाचे नेते तसेच सामाजिक संस्थांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. महाराष्ट्राने एक कर्तृत्व निर्णयक्षम आणि धडाडीचा नेता गमावला अशा शब्दात अनेक नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, सासवड मध्ये आज सकाळी पासून 90% दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहेत, सर्व पुरंदर तालुक्यातील सामान्य जनतेवर शोककळा पसरलेली आहे, विविध पक्षाचे नेते, तसेच सामाजिक संस्थांनी अजित पवार यांच्या निधनाबदल तीव्र दुःख व्यक्त केले आहे, महाराष्ट्राने एक कर्तुत्व निर्णय क्षम धडाडीचा नेता गमावला असून, अशा शब्दांमध्ये अनेक नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केले आहेत .राजकीय प्रवास अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते, बारामती मतदारसंघातून अनेक वेळा ते आठ वेळा निवडून आलेले आहेत, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री यासारखे जबाबदारी सांभाळत राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या स्पष्ट वक्तेपणा, निर्णय क्षमता आणि प्रशासकीय पकडीसाठी ते ओळखले जात होते, शोक संदेश त्यांच्या निर्णयाने केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच नव्हे ,तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का बसलेला आहे, राज्यातील अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले असून ,शासकीय पातळीवर शोक व्यक्त करण्यात येत आहेत, अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना, उपविभागीय अधिकारी तथा प्रांत पुरंदर वर्षा लांडगे व तहसीलदार विक्रम राजपूत पुरंदर या कडून तीव्र दुःख व्यक्त शासकीय पातळीवरून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments