राज्यातील 12 जिल्हा परिषद व त्या अंतर्गत 125 पंचायत समितीच्या सार्वत्रि क निवडणुका मतदानाची दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी तर मतमोजणी दिनांक 9 फेब्रुवारी 2026रोजी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: राज्य निवडणूक आयोगाचे संदर्भातील अनुक्रमांक 2 समोरील 13.1.2026 रोजीच्या पत्रान्वये राज्यातील 12 जिल्हा परिषद व त्या अंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, सदर निवडणूक कार्यक्रमांनुसार संबंधित जिल्हा कार्यालयांनी दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी उमेदवारी मागे घेणे ,आणि चिन्ह वाटपा नंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, मतदान,मतमोजणी व निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे, हे टप्पे पार पडणे शिल्लक आहेत, माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिनांक 31 जानेवारी 2026 च्या पुढे दोन आठवडे ची मुदत दिलेली आहे, मात्र दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित आशाताई अनंतराव पवार यांच्या अपघाती निधनामुळे, राज्य शासनाने संदर्भातील अनुक्रमांक 3 समोरील 28 जानेवारी 2026 रोजीच्या बिनतारी संदेश नावे राज्यात दिनांक 28 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 पर्यंत राज्यस्तरावरील दुखावटा जाहीर केला आहे, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना उपरोक्त परिच्छेदातील नमूद कालावधीमध्ये प्रचार करणे सोयीचे होणार नसल्याचे परिणाम, मतदान व मतमोजणी इत्यादी निवडणूक टप्पे निश्चित केलेल्या दिनांकात पार पाडणे, शक्य होणार नाही, उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता, महाराष्ट्र जिल्हा परिषदा मतदार विभाग आणि निवडणुका घेणे नियम 1962 तसेच महाराष्ट्र पंचायत समिती निर्वाचक गण आणि निवडणूक घेणे नियम 1962 यामधील अनुक्रमे नियम 11(2 अ) आणि नियम 13 (3) मधील तरतुदीनुसार 12 जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत 125 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा परिच्छेद 1 मध्ये नमूद केलेल्या उर्वरित टप्प्यांचा निवडणूक कार्यक्रम नव्याने देणे आवश्यक झाले आहे, तरी या सोबतच्या परिशिष्ट 1 अनुसार सुधारित निवडणूक कार्यक्रम देण्यात येत असून, जिल्हाधिकारी यांनी सदर निवडणूक कार्यक्रमातील वेळापत्रकानुसार निवडणुकीचा कार्यक्रम राबविण्यात यावा, तसेच जिल्हाधिकारी यांनी निवडणुकीच्या सुधारित कार्यक्रमाची सूचना 31 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करून, सदर कार्यक्रमास आवश्यकतेनुसार व नियमाप्रमाणे व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी, निवडणुकीची आचारसंहिता सध्या सुरू असून, निवडणुकीचा निकाल घोषित होईपर्यंत, अमलात राहील तसेच राज्य निवडणूक आयोगाचे दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी च्या पत्रान्वये देण्यात आलेल्या सूचनांचे जिल्हाधिकारी यांनी पालन करावे, सदरचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, राज्य निवडणूक आयोगाचे ,संकेतस्थळ व ई-मेल आयडी पुढील प्रमाणे आहे संकेतस्थळ: https:// mahasec. maharashtra. gov. in ई-मेल :sec.zpp@mah.gov.in जिल्हाधिकारी यांनी निवडणुकीच्या सुधारित कार्यक्रमाची सूचना प्रसिद्ध करण्याची दिनांक 31 जानेवारी 2026 शनिवारपासून, मतदानाची दिनांक 7 फेब्रुवारी 2026 शनिवार सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत मतमोजणी दिनांक 9 फेब्रुवारी 2026 सोमवार या दिवशी सकाळी दहा पासून पुढे तर निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे दिनांक 11 फेब्रुवारी 2026 बुधवार पर्यंत या संदर्भातील माननीय राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार सुरेश काकांणी सचिव राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी ही सर्व माहिती दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments