Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरीला लागली हळद; तर देवाला हळद लावण्यासाठी महिलांची अलोट गर्दी; आज मध्यरात्री धुमधडाक्यामध्ये देवाचा लग्न विवाह सोहळा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्री शेत्र वीर तालुका पुरंदर येथील श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांना हळद लावण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडला, मानकरी राऊत यांच्या महिला बरोबरच गावातील अनेक महिलांनी श्रीनाथ जोगेश्वरीला हळद लावली, हळद लावण्याच्या कार्यक्रमांमध्ये महिलांनी देवाजवळ जाऊन स्वतःच्या हाताने, हळद लावता येते, त्यामुळे महिलांसाठी हा क्षण आनंदायी असतो, परिणामी वीर आणि पंचक्रोशीतील महिलांनी श्रीनाथ जोगेश्वरी यांना हळद लावण्यासाठी खूप गर्दी केली होती, शनिवारी दिनांक 31 पहाटे पाच वाजता पूजा होऊन, मुख्य गाभारा बंद करण्यात आला, नंतर सहा वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला, सकाळी देवाला अभिषेक घालण्यात आले, दुपारी बारा वाजता धुपारती होऊन, मुख्य गाभारा बंद करण्यात आला, दुपारी 1:15 वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला, दुपारी तीन वाजता देवाचे मानकरी, समस्त राऊत मंडळी, देऊळ वाड्यात आले वाजत गाजत देवाची हळद मंदिरात आणली, विधिवत पूजा होऊन, पोशाख व फुलांची मंडवळी देवाला बांधण्यात आली, सायंकाळी 5:30 वाजता देवाला हळद लावण्यासाठी प्रशासकीय स्तरातून वर्षा लांडगे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत पुरंदर व प्रणोती श्रीश्री माळ गटविकास अधिकारी पुरंदर या वीर या ठिकाणी देवाला हळद लावण्यासाठी हजर होत्या,त्याच्या समवेत मंजुषा धुमाळ सरपंच वीर, प्रमिला देशमुख वीर देवस्थान विश्वस्त उपस्थित होत्या. श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टमार्फत यात्रा नियोजनाची संपूर्ण तयारी झालीचे असल्याचे प्रशासनाबरोबर, देवस्थान ट्रस्ट ही यात्रा सोहळ्यासाठी पूर्ण तयारीत असून, रविवारी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या देवाच्या लग्न सोहळ्याची संपूर्ण विधिवत तयारी सुरू असल्याचे देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मोहन रावसाहेब धुमाळ यांनी यावेळी सांगितले, समस्त मानकरी राऊत, ग्राम पुरोहित मुकादम पाटील गुरव यांच्या सुवासिनींच्या वतीने, शनिवारी दुपारी साडेतीन वाजता देवाला हळद लावण्यास सुरुवात करण्यात आली, सर्व ग्रामस्थ महिला तसेच बाहेरून आलेल्या महिला भाविकांनी मंदिरात देवाला हळद लावण्यासाठी गर्दी केली होती, सायंकाळी सात वाजेपर्यंत देवाला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होता, महिला वर्गाने खूप गर्दी केली होती, तसेच देवस्थानमार्फत दर्शन बारी, होमगार्ड व्यवस्था करण्यात आली होती, यावेळी विश्वस्त व सल्लागार मंडळ, ग्रामस्थ, मानकरी, दागीनदार सालकरी मंडळी आधी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments