Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील माहूर या ठिकाणीच्या शेतामध्ये विहिरीच्या ठिकाणी महिलेचा मृतदेह आढळला सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: माहूर येथे संतोष दिनकर जगताप यांच्या शेतातील विहिरीमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला असून, याबाबत संतोष दिनकर जगताप रा. माहूर ता. पुरंदर यांनी याबाबत सासवड पोलीस स्टेशनला खबर दिली असून, संतोष जगताप हे रविवारी दि. 26 सकाळी अकरा वाजायच्या सुमारामध्ये विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी गेले होते, त्यावेळी विहिरीत एका महिलेचा मृतदेह पालथ्या अवस्थेत पाण्यावर तरंगताना त्यांना दिसला, त्यांनी परिंचे पोलीस दूर क्षेत्र येथील हवालदार विशाल जाधव यांना फोन द्वारे माहिती दिली, दुपारी एक वाजायच्या सुमारामध्ये पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील, विशाल जाधव, संदीप पवार, प्रियंका जगताप यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले ,नागरिक व पोलिसांच्या मदतीने या महिलेसह विहिरीच्या बाहेर काढण्यात आले असता, ही महिला गावातील सुमन महादेव पांडे असल्याने, तिला रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय सासवड येथे आणले असता, डॉक्टरांनी उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments