Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड पारगाव रस्त्याची दुरावस्था सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड पारगाव सुपा या प्रमुख रस्त्याची दुरावस्था झाली असून, या रस्त्यावर जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे वाहन चालकांना खड्डे चुकविताना मोठी कसरत करावी लागत आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिक आणि पूर्व पुरंदर भागातील प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे, हा मार्ग पूर्व पुरंदर भागातील आठ गावासाठी महत्त्वाचा आहे, गेली वर्षभरापासून पारगाव ते रिसेपिसे दरम्यान, रस्ता रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरू असून, गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे रस्त्याची अवस्था अधिकच दयनीय अवस्था झालेली आहे, रस्त्याच्या सकल भागामध्ये पावसाचे पाणी साचून, खड्डे तयार झालेले आहेत, पूर्व भागासाठीचा हा मार्ग कायमचाच दुर्लक्षित राहिल्याची भावना ही सामान्य नागरिकांमध्ये, त्यांचे मत व्यक्त करत आहेत. पाच वर्षांपूर्वी या मार्गाच्या डांबरीकरणाचे काम झाले होते, त्यानंतर या रस्त्यावर केवळ तात्पुरत्या स्वरूपाचे खड्डे बुजवण्याचे काम झाले आहे, रस्त्याच्या मजबुती करण्यासाठी किंवा नवीन डांबरीकरणासाठी कोणतीही कार्यवाही केली नाही असे, या मार्गावरील शेतकरी (उद्योगपती) गणेश काशिनाथ मोरे त्यांनी सांगितले. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता त्यांचीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही व रिप्लाय सुद्धा देत नाही तर यावर विद्यमान आमदार पुरंदरचे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता यांची त्वरित निलंबित ऑर्डर काढावी, हे नक्की पुरंदरच्या विद्यमान आमदारांनी किती दिवस असे प्रकरण ताटकळत ठेवायचे आहे हे स्वतः त्यांनी खुद्द उत्तर द्यावे, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम अभियंता यांची त्वरित निलंबित ची ऑर्डर काढावीच असे पुरंदरचे सामान्य नागरिकांचे मत आहे.

Post a Comment

0 Comments