Hot Posts

6/recent/ticker-posts

`माघ शुद्ध पौर्णिमेच्या रात्री श्रीनाथांच्या लग्न सोहळ्याने वीरनगरी दुमदुमली तर लाखो भाविकांची उपस्थिती सवाई सर्जाच चांगभलं जयघोषात श्रीनाथांचा विवाह सोहळा पार पडला सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वीर यात्रेला सुरुवात झाली. कोंडीत पालखी ७ वाजता वेशीवर दाखल झाली. देवाची धुपारती, मुकादम पाटील धुमाळ, सालकरी, मानकरी दागिनदार विश्वस्त सल्लागार मंडळ यांनी स्वागत करून, पालखी जागेवर स्थानापन्न झाली.रात्री ११ वाजता समस्त राऊत मंडळी यांचेकडून देवाला आकर्षक पोशाख करून, विधी करण्यात आले. कोडीत पालखी, वीरची पालखी, अंधारचिंच येथे दाखल झाली. याठिकाणी मानकरी यांना फुलाच्या माळा घालून, वाई, कन्हेरी पालखीची भेटाभेट झाली. सर्व पालख्या मंदिराकडे रवाना झाल्या. मंदिरात प्रवेश केल्यावर एक प्रदक्षिणा होऊन, मुकादम पाटील ,धुमाळ यांचे हस्ते विधी व मंत्रोपचार होऊन पारंपारिक विवाह सोहळा पार पडला. यावेळी पुरोहित, मानकरी, सालकरी दागिनदार श्रीनाथ भक्त उपस्थित होते. सदर सोहळा पाहण्यासाठी लाखोचा जनसमुदाय वीरमध्ये लोटला होता. यावेळी पोलीस प्रशासन, होमगार्ड, पोलीस मित्र, कमांडो फोर्स श्रीनाथ सेवा चे स्वयंसेवक यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, फटाके अतिशबाजी, फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिरात फुलांची सजावट श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट व दिलीपदादा धुमाळ मित्रपरिवार यांचेमार्फत करण्यात आली, फटाके आतिषबाजी स्वप्नील हरकळ, स्वप्निल झांबरे, शिरवळ वाले, प्रशांत साळुंखे, मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई कैलास औसक बडदे, बुणगे बंधू, श्रीनाथ लाईट रवी चौरे, नितीन शेंडकर, जनरेटर व्यवस्था राहुल वाल्हेकर, मिथुन धुमाळ स्पीकर व्यवस्था कांदळकर यांचेमार्फत करण्यात आली.श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट यांनी संपूर्ण यात्रा उत्सवाचे नियोजन केल्याचे मुख्य विश्वस्त मोहनराव रावसाहेब धुमाळ यांनी सांगितले. यावेळी सदर श्रीनाथांचा लग्न सोहळा पार पाडण्यासाठी सर्व विश्वस्त मंडळ, सल्लागार सालकरी मानकरी दागीनदार ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments