सासवड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रारूप मतदार यादीवर प्राप्त हरकतीवर 29 ऑक्टोंबर रोजी सुनावणी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: मा. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्याकडील आदेशानुसार राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायती सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम 2025 रोजी जाहीर करण्यात आला असून, सासवड नगर परिषदेची प्रारूप मतदार यादी ही सासवड नगर परिषदेची अधिकृत वेबसाईट व मा. जिल्हाधिकारी पुणे यांच्या संकेतस्थळ आणि सासवड नगरपरिषद कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती, प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादीवर प्राप्त हरकती व सूचनावर विचार करून, मतदार यादी अंतिम करण्याबाबत निर्णय घेणे, कामे मा. उपविभागीय अधिकारी उपविभाग पुरंदर यांनी प्राधिकृत करण्यात आले आहे, सासवड नगर परिषदेस दिनांक 17/ 10/ 2025 पर्यंत साधारण 2,800 हरकती प्राप्त झाल्या असून, सदरील हरकती हा हरकतदारांनी नमुना 'अ 'व नमुना' ब' मध्ये हरकती नोंदविल्या आहेत, स्थळ पाणी नुसार आढळून आलेल्या हरकतीदारांना नगरपरिषदेमार्फत दि. 29 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11:30 वाजता नगरपरिषदेच्या पहिल्या मजल्यावर सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत, सदरील सुनावणी मा. प्राधिकृत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उपविभाग पुरंदर वर्षा लांडगे यांच्या अधिस्तर होणार आहेत, तरी सदर सुनावणीस नमुना 'अ' व नमुना 'ब' मते हरकती नोंदविलेल्या हरकतदारांनी व नोटीस बजविण्यात आलेल्या आहेत, व जे हरकतदार स्थळ पाहणी वेळी आढळून आले नसतील व यांना नोटीस दिल्या नसतील अशा सर्व हरकतदारांनी दि. 29 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11:30 वाजता नगरपरिषदेच्या पहिल्या मजल्यावर सुनावणीस कागदपत्राच्या पुराव्यासह उपस्थित राहावे ,असे सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी आवाहन केले आहे. हरकतदारांची व ज्या मतदारावर हरकत घेण्यात आलेली आहे अशा मतदारांची यादी सासवड नगर परिषदेच्या अधिकृत वेबसाईट www.saswadnagarparishad.org व नगरपरिषदेच्या कार्यालयीन नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments