Hot Posts

6/recent/ticker-posts

डिजिटल मिडिया परिषदेच्या प्रदेश सहसचिवपदी राहुल शिंदे यांची निवड जाहीर सासवड पतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या आदेशानुसार डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया परिषदेच्या प्रदेश सहसचिव पदी पुरंदर तालुक्यातील राहुल शिंदे यांची नियुक्ती जाहीर केली आहे.     अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा. श्री. एस. एम. देशमुख सर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात डिजिटल मिडिया परिषदेची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लवकरच राज्य, विभागीय आणि जिल्हा पातळीवर पदाधिकारी निवडी संदर्भांत एक व्यापक बैठक घेतली जाणार असल्याची माहिती सुद्धा प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया परिषदेच्या प्रदेश सहसचिव पदी राहुल शिंदे यांची नुकतीच निवड जाहीर केली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या व डिजिटल मिडिया परिषदेच्या सर्व राज्य स्तरीय अधिवेशने, विभागीय मेळावे, महत्वपूर्ण बैठकांना उपस्थित राहणे बंधनकारक असल्याच्या सुचना राहुल शिंदे यांना देण्यात आल्या.       राहुल शिंदे हे या पूर्वी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष होते. काही काळ शिंदे हे पुणे जिल्हा सोशल मिडियाचे उपाध्यक्ष होते. त्यांनी याकाळात परिषदेच्या धेय्य धोरणांनूसार भरीव असे संघटनात्मक काम केले आहे. कोव्हिड काळात ते पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष असताना पत्रकारांना भरीव मदत केली होती.      राहुल शिंदे यांच्या या निवडीबद्दल अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर यांनी व डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, पुणे जिल्हा डिजिटल मिडिया परिषदेचे अध्यक्ष भरत निगडे, पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तानाना भोंगळे, अध्यक्ष योगेश कामथे, सचिव अमोल बनकर, (आपल्या इच्छेनुसार नांव वाढवावीत) यांसह पुणे जिल्हा पत्रकार संघ व पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणी सदस्यांसह सह सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. फोटो : राहुल शिंदे.

Post a Comment

0 Comments