Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील भैरवनाथ चैत्री उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी अजय जगताप तर उपाध्यक्षपदी नितीन भोंगळे सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड तालुका पुरंदर येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिर येथे चैत्री उत्सव कमिटीची वार्षिक बैठक होऊन, यात चैत्रिक उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी अजय गणपत जगताप यांची तर उपाध्यक्षपदी नितीन वसंतराव भोंगळे यांची बिनविरोध निवड झाली .या निवड सभेच्या अध्यक्षस्थानी उद्योजक सुधाकर गिरमे हे होते, येथे श्री काळभैरवनाथ चैत्रि उत्सव मंडळाची रविवारी दिनांक आठ रोजी बैठक झाली, ही बैठक श्री काळभैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जगताप व माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली यात चैत्री यात्रेत होणाऱ्या कार्यक्रमाबरोबरच अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली ,तसेच मागील वर्षी झालेल्या उत्सवाचा आढावा घेण्यात आला, यावेळी माजी आमदार संजय जगताप , माजीअध्यक्ष रमेश जगताप, उपाध्यक्ष पांडुरंग भोंगळे, सुधाकर गिरमे, उत्सव कमिटीचे माजी अध्यक्ष रवींद्र शिरसागर, उपाध्यक्ष प्रकाश जगताप, कैलास कावडे बुवा, गिरी गोसावी महाराज, उत्तम जगताप,संग्राम जगताप, रामभाऊ इनामके आदी उपस्थित होते. नवीन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी आमदार संजय जगताप व माजी पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला ,रविंद्र पंत जगताप यांनी सूत्रसंचालन केले, तर ट्रस्टचे सचिव विठ्ठल शिंदे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments