Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील पुरंदर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे अमित झेंडे सभापती व शिवसेना (शिंदे गटाचे) प्रवीण जगताप उपसभापती यांची अनपेक्षित अशी युती सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर पंचायत समितीत राष्ट्रवादी, (शिवसेना शिंदे गटाची) अनपेक्षित अशी युती होऊन, राष्ट्रवादीचे अमित झेंडे सभापती व शिवसेना (शिंदे गटाचे) उपसभापती प्रवीण जगताप यांची अनपेक्षित अशी युती होऊन, त्यांची निवड स्पष्ट करताना अमित झेंडे यांना सभापती पदासाठी फॉर्म भरला होता, तर भाजपकडून सायली शिंदे यांनी फॉर्म भरला होता, त्यामध्ये झेंडे यांना सहा मते तर शिंदे यांना दोन मते यामध्ये अमित झेंडे यांना सहा मते मिळाल्यामुळे, पुरंदर पंचायत समितीच्या सभापती पदासाठी अमित झेंडे तर उपसभापती पदासाठी (शिवसेना शिंदे गटाची) प्रवीण जगताप यांचा फॉर्म तर माऊली यादव यांनी उपसभापती पदासाठी फॉर्म भाजपतर्फे भरलेला होता यामध्ये जगताप यांना सहा मते तर यादव यांना दोन मते पडल्यामुळे, (शिवसेना शिंदे गटाचे) प्रवीण जगताप यांची उपसभापती पदी निवड झाल्याचे पिठासन अधिकारी उपविभागीय अधिकारी तथा प्रांत वर्षा लांडगे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रणोती श्रीमाळ, अति सहाय्यक निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील यांनी निवडणुकीच्या वेळी मदत करून, पिठासन अधिकारी तथा प्रांत वर्षा लांडगे यांनी सभापती पदासाठी झेंडे व उपसभापती पदासाठी जगताप यांची निवड जाहीर केली, या मनोमिलनामुळे पुरंदर तालुक्यात राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलेली दिसून आली, पुरंदर पंचायत समितीमध्ये आठ जागांसाठी प्रामुख्याने, निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडे चार, शिवसेना शिंदे गटाकडे दोन, तर भाजपचे दोन सदस्य निवडून आले होते, सभापती पदासाठी आवश्यक असणारे पाच सदस्य कोणतेही पक्षासाठी नसल्याने, सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक प्रकारे किंगमेकर ची भूमिका होती, परंतु त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सह भाजपसोबत की,युती करणार याविषयी पुरंदरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पुढाऱ्यांनी आज सकाळी वेगळाच बदल घेऊन, अचानक शिवसेना शिंदे गटाशी सकाळी दहा वाजता झटका दिल्याने, नाट्यमय घडामोडी नंतर ,राष्ट्रवादी काँग्रेसनी शिवसेना शिंदे गट सोबत युती करत उपसभापती पद शिवसेनेला देण्याचा निर्णय घेतला, राजकीय दृष्ट्या भाजपशी युती होण्याची शक्यता जास्त अधिक मानली जात होती, परंतु राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर व विद्यमान आमदार विजय शिवतारे यांच्याशी साधलेले राजकीय समन्वय लक्षात घेऊन, अखेरशी शणी सोबत सत्ता स्थापनेसाठी निर्णय घेण्यात आला, यावेळी गटनेत्या राष्ट्रवादी स्मिता निगडे, अर्चना कटके, मोनिका कांबळे, माणिक निंबाळकर, सायली शिंदे ,माऊली यादव हे सदस्य ही तसेच जिल्हा परिषदेचे हरिभाऊ लोळे, रूपाली झेंडे, डॉक्टर प्राजक्ता दुर्गाडे, अजय इंगळे राष्ट्रवादीचे पुरंदर तालुक्यातील पदाधिकारी सदस्य, कार्यकर्ते, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते सदस्य, युवक वर्ग, पत्रकार आदी उपस्थित होते. प्रामुख्याने या निवडीसाठी हात वर करून मतदान घेऊन निवड झाल्याचे निवडीसाठी पिठासीन अधिकारी उपविभागीय अधिकारी तथा प्रांत वर्षा लांडगे यांनी काम पाहिले, त्यांच्या अध्यक्षतेखाली सभापती व उपसभापती पदाची निवड जाहीर करण्यात आली, तसेच त्यांना निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती पिटासन अधिकारी उपविभागीय अधिकारी तथा प्रांत वर्षा लांडगे यांनी ही सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.

Post a Comment

0 Comments