बोपगाव येथील श्रीक्षेञ कानिफनाथ गडावर "रंगपंचमी आनंदोत्सव याञा" उत्साहात साजरा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बोपगाव ( ता. पुरंदर ) येथील श्रीक्षेञ कानिफनाथ गडावर "रंगपंचमी आनंदोत्सव याञा" पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी झाली. ८ मार्च रोजी पहाटे मंदिरात श्री नवनाथ देवस्थान पंच कमिटी ट्रस्टच्या वतीने पुजा, अभिषेक करण्यांत आला. दु. १२ वा. नाथांची आरती झाली. त्यानंतर १२.३० वा. पारंपारीक वाद्यांच्या गजरात प्रथम देवांच्या अंगावर रंग शिंपण्यांत आला. मंदिराच्या शिखरावरुन भाविकांच्या अंगावर रंगांची शिंपण करण्यांत आली. यावेळी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होती. सर्व परिसर रंगांनी रंगून गेला होता. '' रंगपंचमी आनंदोत्सव यात्रा '' उत्साहात संपन्न झाली. सकाळी ९ वा. बोपगाव येथून पालखी - काठी वाजत कानिफनाथ मंदिरावर गेली. त्यानंतर सासवड, भिवरी, गराडे, चांबळी, औताडवाडी, होळकरवाडी, वडकी, उरुळी देवाची येथील मानाच्या शिखर काठ्यांनी रंगपंचमी आनंदोत्सव यात्रेत सहभाग घेतला. रंगपंचमी आनंदोत्सव यात्रेचे आयोजन श्री नवनाथ देवस्थान पंच कमिटी ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानोबा फडतरे, उपाध्यक्ष दिपक फडतरे,सचिव जयवंत फडतरे, खजिनदार नागेश फडतरे, विश्वस्त शिवाजी जगदाळे , प्रकाशनाना का.फडतरे,सुरेश फडतरे, प्रकाशआप्पा का. फडतरे ,महादेव फडतरे, नितीन फडतरे,रमेश फडतरे, मंगेश फडतरे,सोनबा फडतरे व्यवस्थापक संतोष गोफणे, पांडुरंग बाठे , सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील विनायक गायकवाड उद्योजक उत्तम फडतरे आदीसह विविध पक्ष, संस्था, संघटना, मंडळे यांचे पदाधिकारी, बोपगावकर ग्रामस्थ यांनी केले. कानिफनाथ गड पंचक्रोशीतील गावांनी गोपाळ जेवू घालण्याच्या कार्यक्रमात अन्नदान केले.बोपगाव ते कानिफनाथ मंदिरापर्यंत मोफत वाहनसेवा पुरविण्यात आली होती.बातमीसोबत फोटो पाठवीत आहे.फोटो ओळीः- बोपगाव ( ता. पुरंदर ) येथील श्रीक्षेञ कानिफनाथ गडावरील रंगपंचमी
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments