पुरंदर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज महाराजसव अभियान 2026 शिबिर वाघापूर येथे उत्साहात संपन्न सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: ञ मंडल स्तरावरील छत्रपती शिवाजी महाराज महाराजसव समाधान शिबिर अभियान वाघापूर तालुका पुरंदर येथील दुपारी एक वाजता गावातून बैलगाडीत मिरवणूक काढून, भैरवनाथ मंदिरापर्यंत आले, नंतर दिप प्रज्वलन करून, शिबिराचे विद्यमान आमदार विजय शिवतारे, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत ,कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण, निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील, स्मिता गौड भूमीअभिलेख अधिकारी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. शिबिरात बोलताना शिवतारे मनाले की, पुरंदर तालुक्यातील गणन्याय शिबिर घेतल्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांची असणारी प्रलंबित कामे त्वरित गतीने मार्गस्थ होतील, जिल्हा परिषद शाळेत शिकणारी मुले सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुले शाळा शिकत आहेत, चांगल्या अधिकारी पदी ग्रामीण भागातील मुलांची निवड झाल्यास, पुरंदरचा अभिमान जागरूक होतो, अशी शिवतारे यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी तथाप्रांत वर्षा लांडगे म्हणाल्या की, भोगावठादार, प्रलंबित वारस नोंद, सातबारा वाचन पूर्ण करून तुकडेबंदी कायदा रद्द करणे, जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार व हस्तांतरण गावन्याय यादी करून व्यवहार हे नियमित करणार, असल्याचेही त्यांनी सांगितले. शाळेतील मुलांना शैक्षणिक दाखले, जन्म दाखला, मृत्यू दाखला, कुणबी दाखला, विविध असणाऱ्या दाखल्यांचा निपटारा सध्या होत असून, कोणतेही काम सर्वसामान्य शेतकऱ्यांचे अडवले जात नाही, असेही त्यांनी नमूद केले. तहसीलदार विक्रम राजपूत यांनी सांगितले की, पाणंद रस्त्यांची दुरुस्ती, सर्वांसाठी घरे, अंतर्गत पट्टे वाटप प्रलंबित असणारे फेरफार निकाली काढण्याबाबत 1965 फेरफार रद्द झालेली आहेत, घरांचे प्रस्ताव जमा करून घरकुल सरकारची देणे आहेत.115 पाणंद रस्ते खुले करण्यात आलेले आहेत, 63 घरकुलांची यादी, तर 22000 रेशन कार्ड वाटप करण्यात आलेली आहेत, 31500 दाखले देण्यात आलेले आहेत, सातशे प्रकरणाचा निपटारा करण्यात आलेला आहे, 1154 फेरफार तर 785 दुरुस्तीची कामे ही प्रस्तावित कामे राजपूत यांनी नमूद केलेली आहेत, पंचायत समितीचे सदस्य माणिक निंबाळकर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. पुढील शिबिर शनिवार दिनांक 14 मार्च रोजी शिवरी (वाल्हे) शिवरी येथे होईल, शुक्रवार 10 एप्रिल रोजी भिवडी नारायणपूर येथील नारायणपूर या ठिकाणी होणार आहे, शुक्रवार 17 एप्रिल रोजी परींचे येथे होणार आहे ,शुक्रवार आठ मे रोजी सासवड येथे होणार आहे, तर शुक्रवार या दिवशी पंधरा मे रोजी जेजुरी येथे या शिबिर संपन्न होणार आहेत. या शिबिरासाठी स्मिता गौड भूमी अभिलेख, कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण, उमेश गायकवाड, प्रशासक व सरपंच वाघापूर येथील दिपाली कुंजीर, डॉक्टर विक्रम काळे, अनिल कांबळे महिला बालकल्याण पुरंदर पंचायत समिती, रूपाली झेंडे, माऊली यादव, रवींद्र फुल पगारे दुय्यम सहाय्यक निबंधक, सहाय्यक गट विकास अधिकारी अविनाश थोरात, अविनाश बडधे, गणेश मुळीक, मनोज कुंजीर, एडवोकेट गौरी कुंजीर, विजय कुंजीर ,बाळासो मगर, बाळासो कड, पत्रकार राजू शिंदे, राहुल शिंदे, हनुमंत वाबळे, दिपक कापरे, बापू मुळीक, समीर भिंगारदिवे, मंडल अधिकारी दुर्गादास शेळकंदे, तलाठी व विभागाचे मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, विद्युत मंडळ, आरोग्य विभाग सर्व प्रशासक विभागाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते व वाघापूर गाव या ठिकाणचे सुद्धा प्रथम नागरिक, शेतकरी, बहुसंख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन तलाठी प्रमोद झुरंगे यांनी केले, स्वागत एडवोकेट नितीन कुंजीर यांनी केले ,तर आभार प्रदर्शन निवासी नायब तहसीलदार संदिप पाटील यांनी मानले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments