सोनोरी सोसायटीच्या चेअरमनपदी रामभाऊ काळे यांची बिनविरोध निवड सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सोनोरी (ता.पुरंदर)विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रामभाऊ कोंडीबा काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मागील अध्यक्ष दिलीप बळी काळे यांनी राजीनामा दिल्याने ही निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी अमरीन बागवान यांनी रामभाऊ काळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतपणे जाहीर केले. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी नूतन अध्यक्षांचे स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच श्रद्धा काळे, माजी सरपंच बाळूनाना काळे, विलास काळे, भारत मोरे, नितीन काळे, रामदास काळे, सतीश काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते गणेश मोरे,व्हाईस चेअरमन कमल माकर,रमेश काळे, प्रकाश काळे, संजय काळे, तेजस कामथे, पंढरीनाथ माळवदकर, अशोक माकर आदीसह सोनोरीकर ग्रामस्थ उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments