Hot Posts

6/recent/ticker-posts

चेतन महाजन यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश​ सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुका युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष चेतन महाजन यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. पुरंदर-हवेलीचे माजी आमदार आणि पश्चिम महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस संजय जगताप तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा सासवड येथे संपन्न झाला.​याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे यांनी चेतन महाजन यांचे स्वागत केले. महाजन यांचा तळागाळातील दांडगा जनसंपर्क आणि युवकांमधील त्यांची पकड पाहता, आगामी काळात तालुक्यातील भाजपची पक्षसंघटना तसेच युवकांची फळी अधिक मजबूत होण्यासाठी मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी चेतन महाजन यांनीही आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, विकासाच्या राजकारणाला साथ देत आपण आता पूर्ण ताकदीने पक्षसंघटना वाढविण्यासाठी कार्य करणार आहोत.​याप्रसंगी यामध्ये निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे, माजी पंचायत समिती सदस्या सुनिता कोलते, नगरसेवक प्रदीप राऊत, मयूर चौखंडे, माजी उपनगराध्यक्ष विजय वढणे, प्रवीण पवार, संदीप राऊत, मनोज म्हेत्रे, तुषार जगताप, तुषार ढुमे, ॲड. आशपाक बागवान, ॲड. अनुराग टिळेकर, धर्माजी गायकवाड, संपत जाधव, आबा महाजन, गणेश महाजन, मोबीन बागवान, सागर घाटगे, सौरभ जाळिंद्रे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी काळाणे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जयेंद्र निकम यांनी मानले.​फोटोओळ:​ सासवड : भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना चेतन महाजन. समवेत माजी आमदार संजय जगताप, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे, संदीप फडतरे, सुनिता कोलते, विजय वढणे व इतर मान्यवर.

Post a Comment

0 Comments