सासवड येथे तनिष्का अभियानच्या माध्यमातून गुढीपाडव्या निमित्त वाचन संस्कृती व पुस्तकांची गुढी एक उपक्रम सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: तनिष्का स्ञी प्रतिष्ठा अभियान हे फक्त अभियान नसून, सामाजिक चळवळ आहे. या माध्यमातून महिलांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि स्वावलंबन निर्माण करते. सासवड येथे वाचन संस्कृती व पुस्तकांची गुढी उभारुन महिला व विद्यार्थ्यांच्या वाचनाची गोडी निर्माण करण्याचा तनिष्का प्रयत्न असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक व महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर यांनी केले..ते पुढे म्हणाले, “वाचाल तर वाचाल” ही आपल्या संतांची शिकवण आहे. वाचन हे केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नाही, तर ते आपल्या विचारांना दिशा देणारे, व्यक्तिमत्त्व घडवणारे आणि आयुष्य समृद्ध करणारे एक प्रभावी माध्यम आहे. तसेच तनिष्का स्ञी प्रतिष्ठा अभियान एक सामाजिक चळवळ असल्याचे नंदकुमार सागर यांनी सांगितले. सासवड ( ता पुरंदर ) येथील गुरुकुल करिअर अकॅडमीच्या सभागृहात 19 मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त स्ञी तनिष्का व्यासपीठ व गुरुकुल करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यामाने पुस्तक गुढी वाचन संस्कृतीची कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नंदकुमार सागर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच पुरंदर पंचायत समितीचे सभापती अमित झेंडे यांच्या हस्ते पुस्तक गुढीचे पूजन करून याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सागर बोलत होते. आजच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट, सोशल मिडिया यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. माहिती मिळवणे सोपे झाले आहे, पण गंभीर विचार करण्याची क्षमता, एकाग्रता आणि सखोल ज्ञान मिळवण्यासाठी पुस्तकांचे वाचन अत्यावश्यक आहे. पुस्तक हे आपले खरे मित्र आहेत. वाचनामुळे आपल्यामध्येविचार करण्याची क्षमता वाढते भाषेचे ज्ञान सुधारतेकल्पनाशक्ती विकसित होते. आत्मविश्वास वाढतो असे सागर यांनी सांगितले. गुरुकुल अकॅडमी येथे बीड, नगर, उस्मानाबाद, पुणे, पुरंदर अशा 10 तालुक्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील विद्यार्थी एमपीएससी व स्पर्धा परीक्षे पर्यंत पोहोचले आहेत. बारा हजार पुस्तकांची लायब्ररी येथे आहे. अभ्यासाबरोबर संस्काराचा पाया याठिकाणी दिला जातो. विद्यार्थ्याला चौफेर शिक्षण देणे हा संस्थेचा उद्देश असल्याचे प्राचार्य संदीप टिळेकर यांनी सांगितले. कुंडलिक मेमाणे व कला फडतरे यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी पुरंदर पंचायत समितीचे सभापती अमित झेंडे, गुरुकुल करिअर अकॅडमीचे प्राचार्य संदीप टिळेकर, व्यवस्थापिका उषा टिळेकर, रतन टिळेकर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक कुंडलिक मेमाणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सासवड शाखेचे अध्यक्ष ॲड.दिलीप निरगुडे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष बळीराम सोनवणे, भाजपा माथाडी कामगार युनियनचे तालुका अध्यक्ष अमोल जगताप, माजी नगराध्यक्ष ॲड. कला फडतरे, शिवहार लहाणे, दत्तात्रेय रोकडे, बापु मुळीक, तनिष्का गौरी बारटक्के, सुवर्णा कामठे, छाया ताकवले, डॉ. जयश्री होले, शांता यादव, सुचेता कुदळे, माधुरी कुंजीर आदी उपस्थित होते. तनिष्का स्ञी प्रतिष्ठा व्यासपीठाच्या तालुकाप्रमुख कुमदिनी पांढरे यांनी मराठी भाषा आणि मराठी साहित्याचा सन्मान राखण्याची शपथ दिली. क्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संदीप टिळेकर यांनी केले. तर ऐश्वर्या भुजबळ यांनी सूत्रसंचालन केले. तर सकाळचे सासवड शहर बातमीदार दत्ता भोंगळे यांनी आभार मानले.फोटो : सासवड ( ता पुरंदर ) येथे गुढी पाडव्यानिमित्त तनिष्का स्ञी प्रतिष्ठा व्यासपीठाच्या वाचन संस्कृती व पुस्तकांची गुढीचे पुजन करीत असताना पुरंदर पंचायत समितीचे सभापती अमित झेंडे शेजारी संदीप टिळेकर, ॲड.दिलिप निरगुडे, कुमुदिनी पांढरे, बापु मुळीक व इतर.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments