स्त्री शक्ती सन्मान’ सोहळा उत्साहात संपन्न सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : नगरपरिषद सासवड व कुशाग्र इनोव्हेशनस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तरी याकार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.कार्यक्रमासाठी सासवड नगर परिषदेचे नगराध्यक्ष - आनंदीकाकी चंदूकाका जगताप महिला बालकल्याण सभापती - प्रियांका जगताप महिला बाल कल्याण उपसभापती - लीना वढणे नगरसेविका -शीतल भोंडे, अर्चना जगताप, स्मिता सुहास जगताप, स्मिता उमेश जगताप या सर्वांची मान्यवर पदी उपस्तिती लाभली, या कवर्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत शिंदे यानी मांडले, तसेच कुशाग्र इनोवेशन फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाबद्दल व संस्थेच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती विकास चव्हाण यांनी सांगितले तर सक्षम चे प्रकल्प व्यवस्थापक गीता फाटक मॅडम यांनी महिलांना घनकचरा व्यवस्थापनात असणाऱ्या व्यावसायिक संधी याबद्दल सविस्तर माहिती दिली व महिला जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व शहर स्वच्छतेमध्ये असणाऱ्या व्यावसायिक संधी बद्दल महिलांना प्रोत्साहन देऊ व शक्यते सहकार्य करू असे आवाहन महिलांना करण्यात आले. तसेच या कार्यक्रमांमध्ये उपस्थित सर्व महिलांना व सफाई महिला कर्मचारी यांना कुशाग्र फाउंडेशनच्या माध्यमातून मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व एक भेटवस्तू देऊन त्यांच्या सकारात्मक कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. या पूर्ण कार्यक्रमांमध्ये डे एन यू एल एम विभाग सासवड यांच्या प्रमुख जस्मिन मधाळे मॅडम व त्यांच्या सहकारी यांची या कार्यक्रम घडवून आणण्यासाठी विशेष मदत झाली, सोबत आरोग्य विभागाचे रामचंद्र कारंडे व त्यांच्या टीमचे ही सहकार्य लाभले. महिलांना व्यवसाय प्रदान करण्यासाठी असणाऱ्या संधी बाबत आम्हीही प्रयत्न करू जेणेकरून शहर स्वच्छतेला हातभार लागेल व शहर स्वच्छ आणि सुंदर होण्यास मदत होईल. या कार्यक्रमाच्या शेवटी विकास चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानण्यात आले व कार्यकर्माची सांगता करण्यात आली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments