Hot Posts

6/recent/ticker-posts

पिसे गावातील पीर साहेब यात्रेला उत्साहात सुरुवात; हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील पूर्व भागातील शेवटचे पिसे गाव येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या पीर साहेब यात्रेला आजपासून उत्साहात सुरुवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ग्रामस्थांसह पै-पाहुण्यांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन यात्रा समितीच्या वतीने तसेच माजी सरपंच गणेश मुळीक यांनी केले.पिसे गावात हिंदू आणि मुस्लिम बांधव सलोख्याने नांदत असून, पीर साहेब यात्रेला विशेष महत्त्व आहे. या गावात या यात्रेशिवाय इतर कोणतीही यात्रा भरत नाही, ही बाब गावाच्या एकात्मतेचे उदाहरण आहे.यात्रेच्या पहिल्या दिवशी मुळीक कुटुंबाच्या वतीने पारंपरिक काठीचा मान देण्यात आला.ही काठी कै. राजाराम गेनबा मुळीक याच्या प्रितयथॅ सामाजिक कायॅकॅते शेतकरी संतोष राजाराम मुळीक काठी उचलतात काठीची विधिवत पूजा करून गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि ती पीरबाबा साहेब यांच्या दर्ग्यात दर्शनासाठी नेण्यात आली. या मिरवणुकीत संपूर्ण गावातील ग्रामस्थ व पाहुण्यांचा मोठा सहभाग होता.यावेळी मनोरंजनासाठी ‘रंगीला’ ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे यात्रेच्या उत्साहात अधिक भर पडली.कार्यक्रमास आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच यात्रा समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रशासकीय सरपंच रोहन नारायण मुळीक, माजी सरपंच गणेश अशोक मुळीक, उदयोजक संतोष हरिभाऊ मुळीक, माजी सरपंच शांताराम मारुती मुळीक,व्यापारी भाऊसो मुगुट मुळीक, माजी उपसरपंच सोमनाथ अर्जुन मुळीक, माजी सरपंच दिपक हरिभाऊ मुळीक, , रवींद्र गणपत मुळीक, संतोष सुरेश मुळीक, दिलीप उत्तम मुळीक, पत्रकार बापू राजाराम मुळीक, पोलीस पाटील गोपीनाथ नारायण मुळीक बशीर लालाभाई सय्यद नंदकुमार बबन कुटे, भाऊसो रामभाऊ ठोबरे , शिपाई विजय इगले यांच्यासह पीर साहेब दर्ग्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments