Hot Posts

6/recent/ticker-posts

नाईकवस्ती शाळेच्या विद्यार्थ्यांकडून कलाविष्कार सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सुपे खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाईकवस्ती शाळेमध्ये सन 2025 -26 चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मागील तीन वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे मुख्याध्यापक आबासाहेब खवले यांनी सांगितले. शाळेतील सर्व विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सण परंपरांची ओळख, भारुड, शेतकरी गीते, लावणी, कोळी गीते वाघ्या मुरुळी, समाजप्रबोधनपर, कौटुंबिक, देशभक्तीपर, ऐतिहासिक तसेच हिंदी मराठी गीतांवर आपली कला सादर करीत उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाची सुरुवात सरपंच सुरेखा जगताप, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष, सीमा चव्हाण सर्व सदस्य आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुभाष शिवतारे, संतोष जाधव, दिपाली चव्हाण, केंद्रप्रमुख धनाजी नाझीरकर, माजी विस्तार अधिकारी अनिल जगदाळे, सुनील लोणकर, मधुबाला कोल्हे, गणेश कामठे ,भाऊ बरकडे , विजय वाघमारे, गोरक्षनाथ चव्हाण उपस्थित होते. चंद्रकांत घारमळकर यांनी सूत्र संचालन केले तर आबासाहेब खवले यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments