Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील जमीन एकत्रिकरण योजनेतील नकाशा दुरुस्ती बाबत अडवणूक सासवड प्रतिनिधी: बापू मुळे मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: टेकवडी तालुका पुरंदर येथील जमीन एकत्रिकरण योजनेतील नकाशा दुरुस्ती बाबत जिल्हा अधीक्षकांनी आदेश देऊनही ,सासवड येथील भूमी अभिलेख पुरंदर कार्यालयाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शेतकरी मनोहर गजरमल यांनी केला आहे. गजरमल यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेकवडी येथील सर्वे नंबर 24 मधील नकाशात दिशा चुकीच्या दर्शवण्यात आलेल्या आहेत ,ही चूक दुरुस्त करण्यासाठी गजरमल यांनी जुलै 2023 मध्ये दाद मागितली होती, त्यानुसार जिल्हा अधीक्षकांनी 31 जुलै 2023 रोजी दुरुस्तीचे आदेश दिले होते ,मात्र पुरंदरच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी त्यावर कोणताही कारवाई केलेली नाही ,आता दहा मार्च 2026 मध्ये सुनावणीसाठी बोलावले मात्र, स्थानिक कार्यालयाने दुरुस्तीबाबत कोणती चर्चा न करता, शासकीय मोजणीचे तोंडी आदेश देऊन, वेळ मारून नेल्याचा आरोप गजरमल यांनी केलेला आहे, नकाशा दुरुस्त केल्याशिवाय मोजणी करणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य असल्याचे गजरमल यांनी सांगितले. जमीन एकत्र करणाबाबत दर महिन्याला नियमित सुनावणी घेतली जाते, त्यामध्ये सरासरी 10 ते 20 प्रकरणातील त्रुटींची दुरुस्ती केली जाते, यासोबतच दर महा नवीन अर्जही दाखल केले जात असतात, त्यामुळे पारदर्शकता राखण्यासाठी प्राप्त अर्जाच्या नोंदणी क्रमांकानुसार यादी तयार करून, त्यांचे क्रमाने दुरुस्तीचा कार्यवाही पूर्ण केली जाईल. स्मिता गौड उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय पुरंदर.

Post a Comment

0 Comments