Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान विश्वस्तांची पालखी तळाची पाहणी; तर आवश्यक असणाऱ्या सुविधासाठी प्रशासनाला सूचना सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायवारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने बुधवारी दि. 25 रोजी पालखी मार्गावरील पालखी तळ व विविध विसाव्यांच्या ठिकाणाची पाहणी करण्यात आली. यावेळी कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी पालखीतळावर भेट देत संबंधित यंत्रणांना आवश्यक अशा सूचना दिल्या. विविध शासकीय खात्याचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी सासवडच्या नगराध्यक्ष आनंदी काकी जगताप, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, तहसीलदार विक्रम राजपूत, मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक कुमार कदम, तालुका आरोग्य अधिकारी विक्रम काळे, राष्ट्रीय महामार्ग अभियंता अभिजीत औटी, बांधकाम उप अभियंता प्रकाश निगडे, नगरसेवक राजन जगताप, प्रदीप राऊत, ज्ञानेश्वर जगताप, अर्चना जगताप व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या पाहणी दौऱ्यामध्ये पालखी सोहळा प्रमुख एडवोकेट राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजनाथ, चैतन्य महाराज लोंढे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफलकर, चोपदार राजाभाऊ मारुतराव कोकाटे, माऊली महाराज मोरे, यांच्यासह सासवड नगर परिषदेस चंदन टेकडी ते सासवड पालखी तळापर्यंत आवश्यक ठिकाणी वीज व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला फुरसुंगी ते दिवेघाट रस्त्याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करावे, महामार्गावर पुरेशा प्रमाणात प्रकाश असावा आणि मुकामापासून पालखी प्रस्थान करताना, वाहनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या, अशा सूचना देण्यात आल्या, सार्वजनिक बांधकाम विभागाला वीर फाटा ते बोरावके मळा पालखी विसाव्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे प्रस्ताव पाठवण्याचीतर महावितरणला सेवा रस्त्यावर अडथळणारे, विजेचे काम तातडीने हलवण्याबाबत सूचना देण्यात आल्या, यंदा सोहळा जुलैमध्ये असल्याने, पावसाची दाट शक्यता आहे, त्यामुळे शासनाने वारकऱ्यासाठी गतवर्षीपेक्षा दुप्पट निवारा व्यवस्था उभारावा, अशी मागणी तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाला वीर फाटा ते बोरावके मळा पालखी विसावा या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे प्रस्ताव पाठवण्याची, तर महावितरणला सेवा रस्त्यावर अडथळा ठरणारे विजेचे खांब तातडीने रस्ता रुंदीकरणाचा पेज वीर फाटा ते बोरावके मळा या रस्त्याचे भूसंपादन करून रुंदीकरण करण्याची मागणी पालिकेने केली, त्यावर महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता अभिजीत औटी यांनी सासवड बाह्य वळण रस्ता सुरू झाल्याने, शहरातील रस्ता आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे असे स्पष्ट केले. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रकाश निगडे यांनी नव्याने भूसंपादनासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता, मात्र निधी अभावी काम रखडल्याचे सांगितले यावेळी सोहळा कमिटीने तीव्र दखल घेत जिल्हाधिकाऱ्याकडे नव्याने प्रस्ताव सादर करून, या प्रश्न पाठपुरावा करण्याचे निर्देश देण्यात आले.

Post a Comment

0 Comments