पुरंदर तालुक्यातील पिसे येथील पीर बाबा साहेब यात्रा उत्साहात; तर रंगला कुस्त्यांचा जंगी आखाडा; नामवंत मल्लांची हजेरी सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या पिसे तालुका पुरंदर येथील पीर बाबासाहेब यात्रा उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त जमा होणारी देणगी, सामाजिक कामासाठी तसेच सप्ताह, यात्रेच्या वेळी असणारा फंड पिसे गावाच्या लोकसंख्येचे नुसार 1200 ते 1500 असताना गावातील प्रत्येक उत्सवाला गेली पंधरा वर्षांपासून गौरवशाली परंपरा राखत, ऐतिहासिक असा यावर्षी यात्रा कमिटीने निर्णय घेऊन, परंपरा कायम राखली आहे. यात्रेच्या मुख्य पहिल्या दिवशी सोमवार या दिवशी दिनांक 23 रोजी किरण गाजरे निर्मित आर्केस्ट्रा रंगीला पाच यांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील रसिक प्रेक्षककासह महिलांनीही उत्स्फूर्त अशी गर्दी केली होती. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रात्री ढोल लेझीम पथकासह छबिने सुद्धा उत्साहात पार पडले, तर तिसऱ्या दिवशी विश्वासराव पहिलवान नांदवळकर निर्मित लोकशाहीर साहेबराव नांदवळकर तसेच वसंत नांदवळकर सह रवींद्र पिंगळे लोकनाट्य तमाशा सकाळी नऊ वाजता सुरू झाला, तर सायंकाळी पाच वाजता जंगी कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला होता ,यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत मल्लांनी आपली कसब दाखवली, त्यांचा कुस्ती शौकिनांनी मनमुराद आनंद लुटला, या कुस्ती आखाड्यात पंच म्हणून प्रकाश आ. मुळीक, संतोष रा. मुळीक, रजनीकांत वि. मुळीक, दिपक ह. मुळीक तर शेवटची कुस्ती राजुरी गावचे अनुभवी पंच म्हणून वासुदेव (अण्णा) बनकर यांनी काम पाहिले ,एकूण कुस्त्या 76 झाल्या असून, सहा मुलींच्या पार पडल्या, तर नामवंत पहिलवानामध्ये 70 कुस्ती पार पडली. ₹100 पासून ते 65 हजारापर्यंत पिसे गावात कुस्त्या पार पडल्या. यामध्ये गावच्या पहिलवान असल्यामुळे सागर सणस व रितेश मुळीक यांच्यात सात हजार दोनशे रुपयाला कुस्ती लागलेली गावचा पहिलवानाने रितेश मुळीक यांनी कुस्ती चितपट करून, विजय मिळवला ,तर शेवटची कुस्ती कल्याण नाणेकर व नाथा चौगुले यांच्यात बरोबरीत रात्री अकरा वाजता पार पडली, तर पिसे गावच्या यात्रा कमिटी मध्ये निर्णय होऊन, दोन्ही पैलवानांना प्रत्येकी 11 हजार रुपये बक्षीस देऊन ,सन्मानित करण्यात आले ,बाकी 43 हजार रुपये रक्कम पीर बाबा यात्रा उत्सव साहेब दर्गा, मशीद साठी मंदिरासाठी अर्पण करण्यात आले, यामध्ये प्रामुख्याने 40 वर्ष परंपरेनुसार गणपत बापू मुळीक यांच्या उपस्थितीमध्ये आत्तापर्यंत चाललेल्या आखाड्यालाआज उपस्थित ते राहु शकले नाही त्यांनी बक्षीसासाठी विविध प्रकारची रक्कम, सुपूर्त करण्यात आली होती, नामवंत पहिलवानांचा, पंच ,मुख्य पत्रकार यांचा सुद्धा गावच्या यात्रा कमिटीकडून सत्कार करण्यात आला, यासाठी गणेश अ. मुळीक, रामदास (बाप्पू )मुळीक, रवींद्र ग. मुळीक, संतोष हरिभाऊ मुळीक, सोमनाथ अर्जुन मुळीक, शांताराम मारुती मुळीक, संतोष सुरेश मुळीक पत्रकार बाप्पू मुळीक, हनुमंत वाबळे, समीर भिंगारदिवे, विजय गायकवाड, प्रेमचंद कुटे, शौकत सय्यद, बशीर सय्यद, गणेश सांगळे ,प्रकाश आबा मुळीक, ज्ञानदेव शिदकर, संतोष किसन ठोंबरे, बाबुराव खळदकर, ऋषिकेश जहागीरदार, महेश रावसो मुळीक, रमेश नारायण मुळीक, रमेश नारायण शिंदे, गावातील युवक पिढी, शेतकरी बांधव ,यात्रा कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य, वि.कायॅकारी सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, गावातील इंगळे, बोरकर ,अत्रे ,जगताप, सांगळे, शिंदे, गुळंबे, सय्यद, कुटे, मुळीक सर्व गावातील भरपूर प्रमाणामध्ये शेवटच्या कुस्तीला गर्दी करण्यात आली होती ,तर रात्री खास महिलांसाठी पुन्हा एकदा 11 वाजून 15 मिनिटांनी वसंतराव नांदवळकर व रवींद्र पिंगळे यांच्या लोकनाट्य तमाशाचा नारळ फोडून प्रशासकीय सरपंच रोहन नारायण मुळीक यांच्या हस्ते नारळ फोडून सुरुवात करण्यात आली, तर पूजन उद्योगपती संतोष हरिभाऊ मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments