पुरंदर तालुक्यातील संत सोपान काकांच्या समाधी सोहळ्यास दिंड्यांचे आगमन सुरू सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: संत ज्ञानेश्वर महाराज यांची धाकटे बंधू संत सोपानदेव महाराज यांच्या श्रीक्षेत्र सासवड ता. पुरंदर येथील संजीवन समाधी सोहळ्यास शुक्रवार दि.12 ते दि. 19 डिसेंबर या कालावधीमध्ये भक्तीमय वातावरणामध्ये सुरुवात होत असून, राज्याच्या विविध भागातून दिंड्या सासवडमध्ये दाखल होत असून, मंदिर परिसरामध्ये भजन, कीर्तन, आणि हरिनामाचा अखंड जागर रंगणार आहे ,अशी माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त त्रिगुण महाराज गोसावी यांनी दिली. पहाटे काकडा आरती, नंतर महापूजा व अभिषेक पार पडेल ,हरिभक्त परायण संभाजी महाराज बडधे यांचे कीर्तन आणि सोहळा होणार असून दुपारी विजय महाराज भिसे यांची प्रवचन व हरिपाठ, रात्री हरिभक्त परायण अमेय महाराज शिंदे यांच्या जागर भजनाने कार्यक्रमाचे रंगत वाढणार आहे. शनिवारी दि. 13 रोजी परशुराम काळे यांचे कीर्तन आणि सोपानराव वाईकर यांचे प्रवचन होईल, परकाळे दिंडीचे कीर्तन तसेच कुंभारवळण ग्रामस्थांचा जागर होईल, रविवारी दि. 14 रोजी राजाराम महाराज कामठे, काशिनाथ महाराज जेजुरी हरे नमो संस्थान सोलापूर आणि बंडा महाराज कराडकर यांच्या कीर्तने व भजने पार पडतील, सोमवार दि. 15 रोजी पहाटे पवमान अभिषेकानंद गेनबा पवार यांचे कीर्तन ,नगर प्रदक्षिणात राज्यभरातील दिंडी प्रमुखांचा सत्कार आणि रात्री विशाल महाराज इंगळे यांचे कीर्तन, तसेच रांजणी खामगाव आंबेडगाव ग्रामस्थांचा जागर होईल, मंगळवारी दि.16 रोजी दिवे पंचक्रोशी दिंडी सुनील फडतरे ,सोपान काका टेंबुकर आणि बाळासाहेब महाराज देहूकर यांच्या कीर्तन आणि भक्तीमय वातावरण अधिक रंगेल ,17 डिसेंबरला सोहळ्याचा प्रमुख दिवस मार्गशीष वैद्य तृतीया बुधवार 17 डिसेंबर हा प्रमुख दिवस असून, हरी भक्त परायण केशव महाराज नामदास पंढरपूर संत सोपानदेव समाधीचे कीर्तन सादर करतील, दुपारी अंजीर मंडळ ,नवी मुंबई महाप्रसाद देणार असून ,सत्यवती ईदलाबादकर यांचे प्रवचन होईल, सोपान महाराजांच्या समाधी वर्णनाचे अभंग व मंदिर प्रदक्षिणात, तसेच बाळकृष्ण बुवा दिंडीचा जागरण होईल, तर 18 डिसेंबरला रोजी भोपळे दिंडीचे काल्याचे किर्तन होईल ,अशी सर्व माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त त्रिगुण महाराज गोसावी यांनी प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments