Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील विमानतळ संदर्भातील पुणे या ठिकाणी भूसंपादन बैठकीकडे शेतकऱ्यानी पाठ फिरवली सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील नियोजित विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेने वेग घेतला असला तरी, स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध अजूनही कायम स्वरूपामध्ये आहे, विमानतळासाठी भूसंपादन संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीकडे, शेतकऱ्यांनी अक्षरशा: पाठ फिरवली असून, पारगाव, खानवडी, एखतपुर, मुंजवडी, कुंभारवळण, उदाची वाडी, वनपुरी या सात गावातील वस्तीनिहाय व गावठाणनिहाय दोन- दोन सदस्यांना भूसंपादन व मोबदला याबाबत पुणे येथे सोमवारी बोलावण्यात आले होते, यापूर्वीही बोलावलेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना बोलू दिले नाही, असा स्पष्ट इशारा व आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे, यासाठी फक्त पंधरा ते वीस एजंटांना हाताशी धरुण अधिकारी वर्ग व तालुक्याचे विद्यमान आमदार यांनी विमानतळ संदर्भातील घाट घातलेला आहे, त्यामुळे विद्यमान आमदार व तालुक्यातील 15 ते 20 एजंट ही आमचे सात गावातील शेतकऱ्यांचे जमिनीचे मालक नाहीत, शेतकरी हा स्वतः खुद्द हा मालक आहे. जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी यांनी त्या ठिकाणी असणाऱ्या एजंटांना म्हणजे 15 ते 20 जणांना बाजूला सारावेत व शेतकऱ्यांच्या संघ स्पष्ट विमानतळ संदर्भातील बातचीत करावी, असाही स्पष्ट इशारा सामान्य शेतकऱ्यांनी विमानतळ संदर्भात केलेला आहे, विमानतळ विरोधी समितीने पत्रकार परिषदेमध्ये सासवड येथे ही भूमिका स्पष्ट केली. पी.एस. मेमाणे, सरपंच ज्योती मेमाणे, शितल टिळेकर, मंजुषा गायकवाड, उपसरपंच एडवोकेट स्वप्निल होले, प्रताप कुंभारकर, नंदू कामठे, यासह गणेश होले, मंनेश हगवणे, किरण टिळेकर, चंद्रशेखर मेमाणे, विकास मेमाणे, सतीश कुंभारकर, विकास खळदकर, अशोक कुंभारकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments