Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटा मध्ये एका तरुणावर हल्ला सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर आणि हवेली तालुक्याच्या सीमेवर असलेल्या दुसऱ्या वळणावरती बुधवारी दि. 10 रोजी रात्री बिबट्याने भिवरी ता. पुरंदर येथील गणेश लक्ष्मण कटके व दत्तात्रय कटके यांच्यावर हल्ला केला यामध्ये गणेश कटके यांच्या खांद्याला धुकापत झाली असून, याबाबत उद्योजक अक्षय बाळकृष्ण गायकवाड यांनी सांगितले की गणेश कटके व दत्तात्रय कटके हे दोघे बंधू पुणे शहरातील आपले काम उरकून, बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास बोपदेव घाटातून घरी जात होते, यावेळी झुडपात लपलेल्या बिबट्याने ,त्यांच्या दुचाकी वर झडप मारली, गाडी पडल्यामुळे गणेश कटके यांच्या खांद्याला मोठी दुखापत झाली आहे, त्यांच्या मागून पारगाव येथील रहिवासी भाजपनेते गणेश मेमाणे यांची मोटार येत असल्यामुळे, बिबट्या पळून गेला त्यामुळे पुढील अनर्थ टळला ,गणेश कटके यांच्या खांद्यावर पुणे येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याच्या ताबडतोब बंदोबस्त करावा ,अशी मागणीचे वन विभागाला पत्र भिवरीच्या सरपंच मोनाली कटके व उपसरपंच मारुती कटके यांनी दिले आहेत, बिबट्याच्या पुढील वावर पाहून पिंजरा लावण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे ,पुरंदर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments