पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कचेरीवर ठिय्या आंदोलन तर पुरंदरच्या तहसीलदाराकडून प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या मागण्या मान्य सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील गुरुवारी दि. 11 रोजी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दिव्यांग उपस्थित होते, "बच्चू कडू तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है" अपंगाच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, या प्रशासनाचे करायचे काय ,खाली डोके वर पाय अशा घोषणा देत ठिया आंदोलन करण्यात आले. तहसीलदार विक्रम राजपूत यांना प्रहार संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष सुरेश जगताप व भाजप माथाडी कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष अमोल जगताप यांच्या हस्ते मागण्याचे पत्र देण्यात आले .यावेळी महिला जिल्हा अध्यक्ष अनिता कदम, पुणे जिल्हा अध्यक्ष सुरेश जगताप ,जिल्हा कार्याध्यक्ष सुप्रिया लोखंडे, तालुका संपर्कप्रमुख काशिनाथ जगताप, तालुका विभाग प्रमुख हनुमंत नेटके, विष्णुपंत गुंडाळ ,तालुका अध्यक्ष फिरोज पठाण, बाळासो शेवाळे, बाबा धुमाळ, अलका गाडेकर, सासवड शहराध्यक्ष दत्ता दगडे, छाया ठिगळे, आदी संघटनेचे कार्यकर्ते व दिव्यांग मोठ्या प्रमाणामध्ये आधी संख्येने उपस्थित होते. भूमिहीन बेगर दिव्यांगाना राहण्यासाठी जागा मिळावी, हाताचे ठसे, डोळे स्कॅन होत नसल्याने ,आधार कार्ड पासून वंचित राहणाऱ्या दिव्यांगांना आधार कार्ड मिळावीत, तसेच आधार कार्ड अपडेट करावीत,दिव्यांगांना अत्यंत योजनेचा लाभ मिळावा, संजय गांधी पेन्शन योजनेचे प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला महिना अडीच हजार रुपये देण्यात यावेत, तसेच संजय गांधी पेन्शन योजनेसाठी समिती तात्काळ घटीत करावी, आमदार यांच्या सोबत अध्यक्षतेखाली असलेल्या 5% दिव्यांग निधी खर्चासाठी निवारण समिती त्वरित घटित करावी ,अशा विविध मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या, आमदारांच्या पाच टक्के निधीची मागणी सोडता, बाकीच्या मागण्या तहसीलदारांनी मान्य केल्या. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments