Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यामध्ये नवीन प्रशासकीय कार्यालय सासवड एजंटाचा सुळसुळाट; तर पुरंदर तालुक्यात शिक्षकांचा जमीन खरेदी विक्री करण्यामध्ये पण सुळसुळाट यामुळे सामान्य नागरिक पूर्णपणे त्रस्त सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: नवीन प्रशासकीय कार्यालय सासवड येथील विमानतळ संदर्भातून गेल्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेचा विषय ठरत असल्याकारणाने, या ठिकाणी वाढत असलेल्या एजंटगिरी मुळे, काही एजंटांची इतकी बेचूट मुजोरी निर्माण झालेली आहे की, ते थेट विविध विभागांच्या कार्यालयात घुसून सरकारी कामकाजात हस्तक्षेप करत आहेत, इतकेच नव्हे तर काही अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील ते सरळ सरळ वेटीस धरत असल्याचेही, धक्कादायक चित्र दिसत आहे, या सर्व प्रकारामुळे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे, नागरिकांमध्ये मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत, पुरवठा विभाग, गुंठेवारी नोंदी, गौण खनिज, संजय गांधी योजना, शाखा अभिलेख शाखा, महसूल, शेती केंद्र आदी विविध शाखांचे कामकाज सुरू असल्याकारणाने, उपविभागीय कार्यालयामध्ये सुद्धा विमानतळाच्या संदर्भातून व बाकी सर्व स्तरातील क्षेत्रातून एजंट अक्षरशा: सुळ्सुळाट केलेला आहे, या ठिकाणी एजंटांची दादागिरी वाढली असून, कार्यालय सुरू होण्यापूर्वीच ते हजर असतात, अनेक एजंट आणि राजकीय सामाजिक संघटनाची नावे सांगून, त्या ठिकाणी आपले स्वतःचे काम हे एजंट पूर्णपणे करून घेत असल्याकारणाने, सामान्य नागरिकांची कामेही होत नसल्या कारणामुळे नागरिक त्रस्त झालेली आहेत. विविध कारणांनी मोर्चे बांधणी करणारे सुद्धा संघटना या ठिकाणी अधिकारी यांना वेठीस धरत आहेत, आंदोलन करणारे सुद्धा काही कार्यकर्ते हे अधिकाऱ्यांना मोठ्या आवाजामध्ये व दबक्या आवाजामध्ये दहशत पसरून, त्या ठिकाणी अधिकारी याना सुद्धा वेठीस धरत आहेत. दिवस दिवसभर अधिकाऱ्यासमोर बसून विविध दाखले, उतारे, रेशन कार्ड प्रकरणे, अर्ज केसेस यांची कामे लक्ष्मी दर्शनाने करून घेतली जात असल्याचे, सामान्य नागरिका हे सांगत आहेत ,या एजंटांची कामे तातडीने मार्गी लागत असल्या कारणाने, सर्वसामान्य नागरिक हे मात्र बरेच दिवस झाले फेऱ्या मारून सुद्धा त्यांची कामे ही पूर्ण होत नाहीत. नागरिकांच्या म्हणण्यानुसार हे एजंट कोणतेही काम मोफत करत नसल्याकारणाने, विविध प्रकरणाच्या अधिक रक्कम त्याकडून उकळली जात असल्याकारणाने, हेही आरोप होत असल्याकारणाने, अधिकारी कागदपत्राची योग्य तपासणी न करता, अपुरी माहिती असतानाही एजंटांची कामे विशेष कृपेने केली जात असल्याची चर्चेत आहे. या सर्व परिस्थितीमुळे कार्यालयामध्ये मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? अशी अवस्था निर्माण झालेली आहे ?परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने, आणि नागरिकांची उघडपणे आवाज उठवण्यास घाबरत असल्याकारणाने, एजेंटगिरी दिवसे दिवस ही पुरंदर मध्ये वाढत चाललेली आहे ,असेच स्पष्टपणे दिसत आहे. तसेच पुरंदर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये यांचा सुद्धा शिक्षकांचा नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये जमिनी खरेदी विक्रीच्या व्यवहारातून शाळा सोडून त्या ठिकाणी नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये जमीन खरेदी विक्री करण्यासाठी त्या ठिकाणी चार गुंठे, 10 गुंठे, 25 गुंठे जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार हा मोठ्या प्रमाणामध्ये पुरंदर तालुक्यात चाललेला आहे यावर अंकुश हा शिक्षणाच्या बाबतीत शिक्षकावर असणार का? जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक हे नक्की शाळेवर जातात की, नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये जमीन विक्रीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करतात हे स्वत: त्या ठिकाणी शिक्षण अधिकाऱ्यांच्या मार्फत गट विकास अधिकारी पुरंदर यांनी त्वरित लक्ष घालावे, यामुळे सुद्धा पुरंदर मधील याच पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संघटना कडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने देऊन सुद्धा संबंधित एजंटावर व कारवाई करावी तसेच सामान्य नागरिकांना एक प्रकारे न्याय मिळावा यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी ही मागणी यापुढेही करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments