सासवड कोंढवा रोडवरील बोपदेव घाटात जाहिरातींनी भिंती रंगवल्यामुळे चालकाचे लक्ष विचलित होत असल्याबद्दल तक्रार सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड कोंढवा रोडवरील बोपदेव घाटामध्ये सर्व संरक्षक भिंतींवर जाहिराती चिटकवलेल्या अथवा रंगवलेल्या आहेत. यामुळे चालकांचे लक्ष विचलित होऊन छोटे मोठे अपघात होत आहेत. .सासवड पासून कोंढवा पर्यंत सर्व अतिक्रमणे व रस्त्यावर येणारी बेकायदा होर्डिंग्ज ,घाटामध्ये लावलेल्या जाहिराती हटवण्यात याव्यात ही खरेतर या रस्त्याने जाणारे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, आजी माजी आमदार, इतर खात्याचे अधिकारी अथवा न्यायमूर्ती जात असतील कोणीही स्वतःहून तक्रार नोंदवत नाही याचे आश्चर्य वाटते.कारण आपणाकडे तक्रार करूनही काहीही उपयोग होत नसल्याने कोणीही तक्रार करीत नाहीत . याचा अर्थ त्रास होत नाही, असे बिलकुल नाही तर स्वतः उपअभियंता सार्वजनिक बांधकाम खात्याचे सासवड मधीलऑफिस बंद असून, अधिकारी "रेस्ट हाऊस" येथे का बसतात ?अधिकारी सासवड मध्ये सुरू असलेल्या सायकल ट्रॅक च्या निकृष्ट कामावर फिरकत नाहीत. .अथवा माहितीचा फलक लावत नाहीत,चालू कामाची माहिती मागवली तरीही दिली जात नाही. अशा आशयाच्या तक्रारी आपणाकडे लेखी स्वरूपात दाखल केलेल्या आहेत . परंतु लोकांना कोणतीही माहिती आपले खाते देत नाही अथवा माहिती सार्वजनिक करीत नाही निदान लोकांच्या जीविताचा विचार करून रस्त्यावरील घाटातील जाहिराती हटवण्यात यावे अशी सविस्तर माहिती डॉ.उदयकुमार जगताप यांनी ही माहिती दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments