Hot Posts

6/recent/ticker-posts

सासवड कोंढवा रोडवरील झोपडपट्टी वासियांचें अतिक्रमण काढावे सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड कोंढवा रोडवरील खंडोबामाळ झोपडपट्टी वासियांचें अतिक्रमण काढणयासाठीसासवड मधील खंडोबामाळ झोपडपट्टीतील रहिवाशांनी कोंढवा सासवड रस्त्यावर पाटे, वरवंटे विक्रीची दुकाने सुरू केली आहेत.रस्त्यावर अतिक्रमण करून पाटे वरवंटे ठेवले आहेत, त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. पाटे, वरवंटे बनवण्यासाठी ग्राइंडर वापरल्याने, दगडाची धूळ रस्त्यावर उडत आहे, त्याचा नागरिकांना व येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालक व प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे .रस्त्यातील अडथळा दूर करावा खरेतर अशा प्रकारे अतिक्रमणे हटवण्याची जबाबदारी आपल्या खात्याची सार्वजनिक बांधकाम विभाग व ट्रॅफिक पोलिसांचीही आहे, परंतु सर्वजण गप्प आहेत . या अतिक्रमणामुळे या ठिकाणी अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत . तक्रारीची दखल घेऊन अतिक्रमण ताबडतोब हटवावे अशी विनंती डॉ. उदयकुमार वसंतराव जगताप यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments