शेतकरी कर्जमाफी बाबत मुख्यमंत्री यांची विधानसभेमध्ये मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांची घोषणेनंतरचा विषय असा की कर्जमाफी ही सवॅ सामान्य शेतकरी यांना देणारच पण ... सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: राज्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या थेट मदतीबाबत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर माहिती दिली अशी की, हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यामध्ये प्रस्तावावरील चर्चेदरम्यान ते बोलत असताना, राज्य सरकारकडून आत्तापर्यंत 15 हजार सात कोटी रुपयांची थेट मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली असून, 92 लाख शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानी पोटी पैसे देण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारने 32,000 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते, यामध्ये दहा हजार कोटी रुपये पायाभूत सुविधासाठी, 2,000 कोटी नरेगा मधून आणि उर्वरित रक्कम थेट मदतीसाठी होती या पॅकेज मध्ये तीन हेक्टर ची मर्यादा ठेवण्यात आली होती, एनडीआरएफ च्या मर्यादेनुसार मदत दिल्यानंतरही, रब्बी हंगामासाठी प्रती हेक्टर 10,000 रुपये अतिरिक्त देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता, पशुपालकांना पशुधन हानीपोटी देण्याची आश्वासन ही दिलेले होते, असे सर्व पैसे देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. अतिवृष्टीमुळे बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी 27,000 विहिरीसाठी 80 कोटी रुपये उपलब्ध करून, देण्यात आलेले असून, तसेच सार्वजनिक सुविधा वीज कामे, रस्ते, इमारती, तलाव आणि दुरुस्तीच्या कामासाठी निधी देण्यात आलेला आहे. काही कामांना सुरुवात करण्याचे आदेश देऊन, पुढील अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत ते बोलताना म्हणाले की, कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्यांनाच झाला पाहिजे, बँकांना नाही? राज्य सरकार यासाठी त्यावर ठाम आहेच. सध्याची आर्थिक परिस्थिती ती लक्षात घेऊन, टप्प्याटप्प्याने उपाययोजना केल्या जातील ,साधारण एक जुलै पर्यंत कर्जमाफी बाबतची स्पष्ट योजना जाहीर केली जाईल, असेही स्पष्ट वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments