पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपरिषदेची निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोचली सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी संपलेली असून, आता सर्वांचे लक्ष हे निर्णयाकडे लागलेले आहे, नगराध्यक्षपदासह 11 प्रभागातील 20 नगरसेवक पदासाठी मंगळवारी( दि. 2) रोजी अत्यंत उत्साहामध्ये 67.02% मतदान झाले, या निवडणुकीचा अंतिम आणि बहुप्रत्यक्ष निकाल हा रविवारी (दि. 21) डिसेंबर रोजी लागणार आहे, नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या 45 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात, चोख पोलीस बंदोबस्तात बंद आहे, सर्वाधिक मतदार असलेला प्रभाग 5 मध्ये 3964 मतदार असून, तेथे सर्वाधिक 74.75 टक्के मतदान झाले, सर्वात कमी मतदान प्रभाग आठ मध्ये 59.70 टक्के नोंदवले गेले, प्रभाग चार मधील ताथेवाडी बुथ मध्ये ८०.८३ टक्के इतके मतदान झाले, रविवारी (दि. 21) रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सासवड नगर परिषदेच्या सभागृहांमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे ,अशी निवडणूक निर्णय अधिकारी सतिश थेटे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी मतमोजणीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण केली आहे,मतमोजणी 11 प्रभागासाठी 11 टेबलावर होणार असून, ही प्रक्रिया एकूण चार फेऱ्यांमध्ये पार पडेल. प्रभाग क्रमांक 11 'अ ' साठी प्रभाग क्रमांक चार 'ब ' ची जागा यापूर्वीच बिनविरोध झालेली आहे. न्यायप्रविष्ठ असलेल्या प्रभाग क्रमांक 11 'अ ' साठी नव्याने अर्ज दाखल करून घेतले जाणार नाहीत, तसेच 10 डिसेंबर पर्यंत अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत असून, 20 डिसेंबरला मतदान होऊन, 21 डिसेंबरला निकाल लागणार आहेत, सासवड नगर परिषदेवर कोणाची सत्ता येणार? या प्रश्नाचे उत्तर आता 21 डिसेंबरलाच स्पष्ट होईल, असे सासवडच्या राजकीय भविष्याची दिशा देखील निश्चित होईल, चौकाचौकात व पारावर एक्झिट पोलचे अंदाज या निवडणुकीत प्रामुख्याने भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्य लढत झाली आहे, दोन्ही बाजूकडील कार्यकर्ते विजयाचे दावे करत असल्याने, निकालाबाबतची उत्सुकता अशी शिगेला पोहोचलेली असून, काही प्रभागात अत्यंत चुरशीच्या लढती झाल्या असल्याच्या चर्चा शहरात सुरू असून, त्यामुळे अशा उमेदवारास कार्यकर्त्यांची धाकधूक वाढलेली आहे, चौका चौकात व पारावर असा एक्झिट पोलचे अंदाज लावले जात असून, त्या ठिकाणी पैजा सुद्धा लागलेल्या आहेत, अंदाज दररोज बदलतानाही दिसत आहेत, त्यामुळे कार्यकर्ते व उमेदवार याच्यात चलबिचल चालू आहे, प्रभाग 1) एकूण मतदार 3,057 झालेले मतदान 2,199 71.93% .प्रभाग क्रमांक 2) एकूण मतदार 1,937 झालेले मतदान 1,379 टक्केवारी 71.19% पभाग 32 प्रभाग क 3 एकूण मतदान 2,305 झालेले मतदान 1,690 टक्केवारी 73.32%. पभाग क्रमांक 4) एकूण मतदार 3,634 झालेले मतदान 2,427 टक्केवारी 66.79%. प्रभाग क्रमांक 5) एकूण मतदार 4,064 झालेले मतदान 2,964 टक्केवारी 74.75%. प्रभाग क्रमांक 6) एकूण मतदार 3,425 झालेले मतदान 2,146 टक्केवारी 62.66%. प्रभाग क्रमांक 7) एकूण मतदार 3,756 झालेले मतदान 2,495 टक्केवारी 66.43%. प्रभाग क्रमांक 8) एकूण मतदार 3,000 झालेले मतदार 1,791 टक्केवारी 59.70%. प्रभाग क्रमांक 9) एकूण मतदार 2,014 झालेले मतदान 1,285 टक्केवारी 62.59% प्रभाग क्रमांक 10) एकूण मतदार 3,074 झालेले मतदान 1,899 टक्केवारी 61.58% प्रभाग क्रमांक 11) एकूण मतदार 3,451 झालेले मतदान 2,283 66.15%. मतदार पुरुष 16, 818 मतदान झालेले 11, 404 महिला 16, 838 मतदान झालेले 11,153 सासवडचे एकूण मतदान 33, 656 तर झालेले मतदान 22,557 टक्केवारीट 67.02%
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments