पुरंदर तालुक्यातील बोपगाव,भिवरी,गुळूंचे याठिकाणी गौण खनिजाचे अवैधरित्या अनाधिकृत वापर वाहतूक व तस्करी करणाऱ्यावर कडक कारवाई त्वरित करणार सासवड पतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: जिल्हाधिकारी पुणे यांच्या कार्यालयातून गौण खनिजकर्म यांच्या आदेश उपरोक्त संदर्भनीय विषयानुसार महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णय क्रमांक गौण खनिज 10/5 25 प्र. क्र. 179/ ख -2 दि. 11 जुलै 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार वाळू व इतर गौण खनिजाचे अवैध अनाधिकृत वापर वाहतूक व तस्करी मध्ये आढळून आलेल्या व्यक्ती यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील तरुदुधीनुसार किंवा दंडात्मक कारवाई न करता संबंधिताविरुद्ध फौजदारी कारवाई म्हणजेच एफआयआर दाखल करण्याची कार्यवाही महसूल विभागामार्फत करण्यात यावी असे नमूद केले आहे, सदर आदेशानुसार ग्राम महसूल अधिकारी बोपगाव भागवत व ग्राम महसूल अधिकारी भिवरी कटारे यांनी दि. 8 /12/ 2025 रोजी अनाधिकृतपणे गौण खनिज, उत्खनन वाहतूक करत असल्याचे आढळून आलेल्या जेसीपी वाहन क्रमांक एमएच१६ बी झेड 6834 या वाहनासंदर्भात सदर वाहन चालक व मालक यांच्या विरोधात सासवड पोलीस स्टेशन येथे या एफ आर आय दाखल करण्यात आली असून, मोजे गुळूंचे गावचे ग्राम महसूल अधिकारी लोंढे यांनी मोजे गुलुचे हद्दीत अनाधिकृतपणे गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ढंपर या वाहनावर कारवाई करत असताना गौण खनिज माफिया कडून शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी नितीन वसंतराव निगडे व आणखी एका अनोळखी इसमावर गुन्हा नोंद केला असून, अनाधिकृत आले असून, त्यावर शासकीय नियमानुसार कार्यवाही चालू आहेत, तरी गौण खनिजाचे अवैध अनाधिकृत उत्खनन वापर वाहतूक व तस्करी मध्ये आढळून आलेल्या व्यक्ती यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल सहिता 1966 मध्ये तरतुदीनुसार केवळ दंडात्मक कारवाई न करता संबंधीचा विरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पुरंदर तालुक्याचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी दिलेला आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments