Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरोगामी संघर्ष परिषदेचा कौतुकास्पद पुढाकार; सासवड येथे पारधी समाजाच्या कुटुंबांना जातीच्या दाखल्यांचे वाटप!सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरोगामी संघर्ष परिषदेच्या (PSP) पुढाकाराने भोर पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांच्या हस्ते सासवड येथे कार्यालयात आज, शुक्रवार, दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी, पारधी समाजाच्या अनेक कुटुंबांना जातीच्या दाखल्यांचे (Caste Certificates) वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमामुळे पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना शासकीय सवलती मिळवून देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्षनायक डॉ. प्रा. सुभाष वायदंडे यांनी या उपक्रमासाठी कार्यकर्त्यांना राज्यभर आदेश दिले आहेत. पारधी समाजाला सामाजिक प्रवाहात आणणे, शिक्षण हक्क मिळवून देणे आणि जातीच्या दाखल्याच्या आधारे त्यांना शासकीय सवलती मिळाव्यात, ही त्यांची प्रमुख भूमिका आहे.या वाटप समारंभात परिषदेचे युवकचे प्रदेशाध्यक्ष मनोज दादा भिसे यांनी जातीच्या दाखले मिळवून देण्यासाठी विशेष पुढाकार घेतला. शिक्षणापासून वंचित असलेल्या या समाजाला आधार देत, त्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे यावेळी कौतुक करण्यात आले.प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांच्या हस्ते अतुल भोसले, अमोल भोसले, करुण भोसले, दुर्गा भोसले, ताराबाई भोसले, हरीश भोसले इत्यादी पारधी समाजाच्या लाभार्थ्यांना जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. या दाखल्यांमुळे त्यांच्या कुटुंबांना शिक्षण, रोजगार आणि इतर सरकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे.प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार, उर्वरित वंचित लाभार्थ्यांनाही लवकरच दाखले वाटप करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.यावेळी वरिष्ठ जिल्हाध्यक्ष गोकुळ भिसे, पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र सल्लागार कमिटीचे अध्यक्ष प्राचार्य पंढरीनाथ आढाळगे,पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अण्णासाहेब धोत्रे,किशोर आढाळगे,अलंकार शेलार, भाऊसो साळुंखे इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते‌.सामाजिक समता आणि न्यायासाठी कार्यरत असणाऱ्या संघर्ष परिषदेने आवाहन केले आहे की, ज्या गरजू व्यक्ती अजूनही जातीच्या दाखल्यापासून वंचित असतील, त्यांनी तातडीने पुरोगामी संघर्ष परिषदेच्या सासवड येथील कार्यालयाशी संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments