वीर देवस्थान ट्रस्ट उपाध्यक्ष अमोल धुमाळ वर मोका अंतर्गत कारवाई करा: एडवोकेट मंगेश ससाने वीर गावातील अमानुष मारहाण धिंड प्रकरणातील पीडित युवकाची समता परिषदेची भेट सासवड प्रतिनिधी: श्रीक्षेत्र वीर (ता, पुरंदर) येथील युवकाला हॉटेलचे बिलावरून केलेल्या बेदम मारहाण व धिंड प्रकरनी संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनंतर प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, आणि सोशल मीडिया वरतीही संताप व्यक्त केला जात आहे. त्याच अनुषंगाने महात्मा फुले समता परिषदेचे प्रवक्ते एडवोकेट मंगेश ससाने व पदाधिकाऱ्यांनी वीर येथे मारहाण झालेल्या सौरभ सुरेश वाघ या युवकाची भेट घेतली. व घडलेल्या घटनेचा निषेध करून संताप व्यक्त केला आहे. तसेच पीडित युवक व त्याच्या कुटुंबाला या गाव गुंडांपासून धोका असल्याने पोलीस प्रशासनाने त्यांना तात्काळ संरक्षण पुरवावे. देवस्थान ट्रस्टचा उपाध्यक्ष अमोल आप्पासाहेब धुमाळ यांनी त्याच्या 20 ते 25 साथीदारासह अमानुष मारहाण केली यानंतर गुडघे टेकून माफी मागण्यास सांगितले तसेच जातीवाचक शिवीगाळ, वांशिक अपमान, तसेच परिसरातून मारत मारत धिंड काढण्यात आली. हे सर्व कृत्य जाती वर्चस्व मधून व सरंजामी मानसिकतेतून केले गेले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याबाबत परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन सखोल चौकशी करावी व मुख्य आरोपी अमोल आप्पासाहेब धुमाळ हा सराईत गुन्हेगार असून याच्यावर यापूर्वी पत्रकारांना शिवीगाळ, धमकावणे दमदाटी यासारखे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे अमोल हा त्याच्या 20 ते 25 साथीदारांसह टोळी चालवत असून त्याच्यावर (मोका) संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत तात्काळ गुन्हे दाखल करावेत असे महात्मा फुले समता परिषदेचे प्रवक्ते एडवोकेट मंगेश ससाने यांनी यावेळी सांगितलेभाग 1: 24 जुलै रोजी रात्री मला झालेली मारहाण आणि मारत मारत काढलेली धिंड यामुळे आजही मी भेदरलेल्या अवस्थेत आहे. जातिवाचक शिवीगाळ आणि गुडघे टेकून मागायला लावलेली भर चौकातील माफी हा प्रसंग माझ्या शरीरालाच नाही तर आत्म्यालाही वेदनादायी ठरला आहे. माझे शारीरिक खच्चीकरण या गाव गुंडांनी केले आहेच परंतु मानसिक खच्चीकरणही केले आहे त्यामुळे मला न्याय मिळावा हीच अपेक्षा असे पीडित युवक सौरभ सुरेश वाघ यांनी सांगितले.या समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान एडवोकेट मृणाल ढोले पाटील, ओबीसी नेते पांडुरंग अण्णा मेरगळ, समता परिषद विजय गिरमे, हर्षल बारवकर, सतीश वचकल, नामदेव गुळदगड, अमोल नवले, सतीश बुरुंगले, नितीन राऊत, प्रवीण होले, अक्षय शिंदे, निलेश कापरे, नाना वाघ, गणेश वाघ, वीरचे माजी सरपंच माऊली वचकल तसेच अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.सदर घटना घडल्यानंतर दोन्ही बाजूंना समजावण्याचा माझा प्रयत्न होता. त्या अनुषंगाने मी भूमिका घेतली तरीही यातून कोणाची मने दुखावले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मी कधीही जातीवाद केला नाही.माझे नाव राजकीय हेतूने घेण्यात आले आहे असे देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष अमोल धुमाळ यांनी सांगितले
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments