Hot Posts

6/recent/ticker-posts

महसूल सप्ताहात पुरंदर तालुक्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन: तहसिलदार विक्रम राजपूत सासवड प्रतिनिधी: एक ते सात ऑगस्ट कालावधीत महसूल सप्ताह होणार साजरा: एक ऑगस्ट 2025 रोजी महसूल दिन आणि एक ते सात ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये महसूल सप्ताह 2025 साजरा करण्यात येणार आहे, या सप्ताहात प्रत्येक दिवशी तहसील कार्यालयामार्फत समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी विशेष मोहीम कार्यक्रम, उपक्रम, शिबिर, महसूल अदालतीचे आयोजन करण्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, तहसिलदार यांच्यासह सर्व महसूल अधिकाऱ्यांना व्हीसी द्वारे दिल्या, महसूल सप्ताह मध्ये विविध उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार असून, यात पुरंदर मधील विविध गावांमधील स्मशानभूमी उभारण्यात येणार आहे, एम सेंड धोरणाची अमलबजावणी गावातील जे मोठे रस्ते, अतिक्रमण मुक्त झाले आहेत, तिथे दुतर्फ वृक्षारोपण करण्यात येणार आहे. 4 ऑगस्ट पासून ऑनलाईन सुनावणीस प्रारंभ भूसंपादनाची सॉफ्टवेअर सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, त्याला पूर्णत्वाकडे नेणार असल्याचे महसूल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे मूळ सेवा पुस्तके, अद्यावत करण्याचे नियोजन केले असल्याची ही माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. महसूल सप्ताहातील कार्यक्रमाचे स्वरूप शुक्रवार 1 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहाचा शुभारंभ होणार आहे ,या दिवशी महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, संवाद उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन केले आहे. शनिवार २ ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन 2011 पूर्वीपासून, रहिवासी प्रयोजनावृत्त, अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना, अतिक्रमित जागाचे पट्टे वाटप करण्यात येईल. रविवार 3 ऑगस्ट रोजी पाणंद, शिवरस्त्यांची मोजणी करून, त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे, 4 ऑगस्ट सोमवार या दिवशी प्रत्येक मंडळ निहाय छत्रपती शिवाजी महाराज महारस्व अभियान राबविण्यात येईल. मंगळवार 5 ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील ज्या लाभार्थ्यांचे थेट लाभ हस्तांतरण झालेले नाही, त्यांना घर भेटी देऊन, डीबीटी द्वारे अनुदानाचे वाटप केले जाईल. बुधवार 6 ऑगस्टला शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे, निष्का शीत करून, त्या अतिक्रमणे मुक्त केल्या जातील, तसेच शर्तभंग झालेल्या जमिनी बाबत शासन धोरणानुसार नियमानुकूल करणे, सरकार जमा करणे, निर्णय घेतले जातील. गुरुवार ७ ऑगस्ट ला एम धोरणाची अंमलबजावणी करून, नवीन मानक कार्यप्रणाली अनुसार धोरण पूर्णत्वास नेले जाईल आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ आयोजित केला जाईल. या महसूल सप्तात पुरंदर तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे ,आवाहन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, करण्यात आले आहे .अशी सर्व माहिती पुरंदरचे तहसिलदार विक्रम राजपूत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

Post a Comment

0 Comments