पुरंदर तालुक्यातील सासवड बस स्थानकाची मुंबईच्या एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी; तर स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सासवड बस स्थानकाला पास देण्यात आला सासवड प्रतिनिधी: सासवड (ता. पुरंदर) येथील बस स्थानकातील स्वच्छता, वीज, पिण्याचे पाणी, प्रतीक्षालय व उपहारगृह आदी सुविधांचा राज्य परिवहन महामंडळाचे अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या बसस्थानकाला राज्य परिवहन महामंडळाच्या श्रीमती यामिनी जोशी प्रादेशिक महाव्यवस्थापक नियंत्रण समिती क्रमांक एक तसेच वरिष्ठ अधिकारी मुंबई यांनी भेट दिली. त्यांनी येथे प्रवाशांना देत असलेल्या स्वच्छता, वीज, पाणी, प्रतीक्षा लय, व उपहारगृह आदी सुविधांची पाहणी केली राज्य सरकारच्या सूचनेनुसार राज्य परिवहन महामंडळाने हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सासवड येथील बस स्थानकामध्ये सुरेश लोणकर सांख्यिकी अधिकारी मुंबई सेंट्रल प्रवीण माळशिकारे स्थानक प्रमुख, संतोष शेगोेकार वरिष्ठ अधिकारी ,दत्तात्रेय मदने सहाय्य कार्यशाळा अधीक्षक, पोपट जैनक वाहतूक नियंत्रक, कैलास जगताप वाहतुक नियंत्रक, महेश भोंगळे वाहतूक नियंत्रक, कैलास गिरमे प्रवासी मित्र ,पत्रकार बापू मुळीक आदी अधिकाऱ्यासोबत पाहणी करताना उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी येथील सुविधा बाबत एक प्रकारे चांगले समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागामध्ये प्रवाशांचे सध्या हाल होत आहेत, सासवड बस स्थानकामध्ये प्लॅटफॉर्मला एस टी व्यवस्थित लावल्या जाव्यात कारण, प्रवाशांना ऊन, वारा, पाऊस याचा सामना करावा लागत आहे. काही वेळ प्रतीक्षाही करत, ताटकळत उभे राहावे लागते, याबाबत यंत्रणेकडे वारंवार मागणी करण्यात आलेली आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे, काही पावले उचलली जावीत यासाठी आगार प्रमुखांनी कटाक्ष पद्धतीने लक्ष यामध्ये घालावे. अशा प्रकारची प्रवासी यांनी मागणी केलेली आहे, तर त्यामध्ये सासवड सुपा रोडवरील त्या ठिकाणच्या एस.टी प्रवासाच्या मध्ये अनुसूचित्ता आहे, त्यासाठी ग्रामीण भागामध्ये फेऱ्या वाढवाव्यात अशा सूचना स्वत: पत्रकार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कडे तक्रारी सांगितल्या आहेत.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments