Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमितपुरंदर शिवसेनेच्या वतीने विविध उपक्रम... सासवड प्रतिनिधी :शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुरंदर तालुकाशिवसेनेच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवूनत्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सासवड येथील कस्तुरबा आश्रम व पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या कुंभारवळण येथील ममता बाल सदनातील मुलांना व निराधारांना शैक्षणिक साहित्य वाटप, काही मुलांच्या शैक्षणिक फी साठी आर्थिक मदत, दिव्यांग मुलांना आवश्यक ती मदत अशा स्वरूपातील तसेच काही ठिकाणी वृक्षारोपण करून वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख उल्हास शेवाळे, तालुका प्रमुखअभिजीत जगताप, सासवड शहर प्रमुख राजेंद्र जगतापआरोग्य समन्वयक संतोष भोसले यांसह राहुल लिंभोरे, शुभम झिंजुर्के, सौरभ कुंभारकर, अक्षय गायकवाड,राहुलहोले, विश्वास गद्रे, बाळासाहेब कामठे, आदित्य कामठे यांसह अनेक शिवसैनिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments