पुरंदर तालुक्यातील वीर या ठिकाणी हल्ला करणाऱ्या 18 जनावर गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: वीर (ता. पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवाचे दर्शन घेऊन, घरी जात असताना, दहा ते बारा जणांनी हल्ला केला. याबाबतची फिर्याद मंगेश महादेव धुमाळ (वय 36 रा. विर ता. पुरंदर यांनी सासवड पोलीस ठाण्यामध्ये ही माहिती दिली. याबाबतची माहिती अशी की सोमवारी रात्री दिलीप विलास धुमाळ आणि चुलत भाऊ अमोल यांना जामीन मिळाल्यानंतर मंगेश धुमाळ व अजित विठ्ठल चव्हाण आणि कुटुंब श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास श्रीनाथ म्हस्कोबा मंगल कार्यालयासमोरून, मोटारीत बसत असताना 10 ते 12 लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला यामध्ये आरोपी करण महादेव वचकल, साहिल सावता वचकल, विकास ठकसेन वचकल आणि सौरभ संजय नवले (सर्व राहणार वीर) यांनी मोटारीवर दगडफेक करून नुकसान केले. निलेश नाथाबा जमदाडे, सचिन नारायण वाघ, हनुमंत गोपाळ चौरे आणि सतीश महादेव वचकल हे काठ्या घेऊन त्यांचा पाठलाग करत होते. पिराच्या मंदिराच्या कोपऱ्यावर आदित्य भानुदास दुर्गाडे, जितेंद्र हनुमंत चौरे आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांची मोटार अडवून, पुन्हा शिवीगाळ केली. याबाबत सासवड पोलीस ठाण्यात आरोपी करण महादेव वचकल, साहिल सावता वचकल, विकास ठकसेन वचकल, सौरभ संजय नवले, निलेश नाथाबा जमदाडे, सचिन नारायण वाघ, हनुमंत गोपाळ चौरे, सतीश महादेव वचकल, आदित्य भानुदास दुर्गाडे, जितेंद्र हनुमंत चौरे, कल्पेश वचकल, योगेश वाचकल व इतर सहा अनोळखी इसम (सर्व रा. वीर तालुका पुरंदर) यांच्यावर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तरी अन्य सहा अनोळखींचा शोध सुरू आहे, असे सासवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक ऋषिकेश अधिकारी हे पुढील तपास करीत आहेत.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments